टीव्ही अभिनेता विनीत रैना दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, श्वेता तिवारीने दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:35 IST2023-11-28T16:31:30+5:302023-11-28T16:35:44+5:30
मुंबईपासून दूर हिमाचल प्रदेशमध्ये त्याचा विवाहसोहळा पार पडला आहे.

टीव्ही अभिनेता विनीत रैना दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, श्वेता तिवारीने दाखवली झलक
सध्या सेलिब्रिटींमध्ये लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. हिंदी मालिकांमधील कलाकारही नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. मध्यंतरी 'इश्कबाज' अभिनेत्री श्रेनू पारेखने लग्न करत असल्याचं जाहीर केलं. तर आता टीव्ही अभिनेता विनीत रैना (Vineet Raina) थेट गुपचूप लग्नबंधनातच अडकला आहे. मुंबईपासून दूर हिमाचल प्रदेशमध्ये त्याचा विवाहसोहळा पार पडला आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीने विनीत रैनाच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. 'इश्क मे मरजावाँ' फेम अभिनेता विनीत रैना त्याचं वैयक्तिक आयुष्य अगदी सिक्रेट ठेवतो. विनीतने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गर्लफ्रेंड अपेक्षासोबत सात फेरे घेतले. अपेक्षा नर्स आहे. २७ नोव्हेंबर रोजी विनीत आणि अपेक्षा लग्नबंधनात अडकले. श्वेता तिवारीने फोटो शेअर केला आहे. यामध्ये नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालत आहेत. यामधून विनीतच्या लेडी लव्हची झलक पहिल्यांदाच समोर आली आहे. विनीत गोल्डन रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. तर अपेक्षाने लाल रंगाचा ब्रायडल लेहेंगा घातला आहे ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
विनीत रैना टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. यामध्ये 'मरजावां','पुनर्विवाह','बेगूसराय' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. विनीतचं हे दुसरं लग्न आहे. २००९ साली तो अभिनेत्री तनुश्री कौशलसोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.