गुढीपाडवा असा साजरा करणार टीव्हीचे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 11:34 AM2018-03-14T11:34:13+5:302018-03-15T15:09:28+5:30

गुढीपाडवा... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.कलाकारांचा उत्साह मालिकांच्या सेटवरही अधिक असल्याचा पाहायला मिळत आहे.त्यामुळेच मालिकांच्या सेटवर आत्तापासून गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला ...

TV actors will celebrate Gudi Padwa | गुढीपाडवा असा साजरा करणार टीव्हीचे कलाकार

गुढीपाडवा असा साजरा करणार टीव्हीचे कलाकार

googlenewsNext
ढीपाडवा... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.कलाकारांचा उत्साह मालिकांच्या सेटवरही अधिक असल्याचा पाहायला मिळत आहे.त्यामुळेच मालिकांच्या सेटवर आत्तापासून गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.अतिशय  जल्लोष  नववर्षाचा स्वागत केले जात आहे.नुतन वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारण्यात आली आहे.देव्हा-यापाशी उभारण्यात आलेली ही गुढी कुणाचंही मन मोहून टाकेल.... त्यात ही आकर्षक सजावट, रोषणाई आणि नवनवीन कपडे यामुळे या सेलिब्रेशनला चारचाँद लागल्याचे पाहायला मिळत आहे.गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी  दिवसाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

हार्दिक जोशी (राणा)- तुझ्यात जीव रंगला



गुढीपाडवा आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.माझ्या आजोबा पणजोबांपासून ज्या पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जायची त्याच पद्धतीने सकाळी लवकर उठून पूजा करून गुढी उभारली जाते. घरी आई नैवेद्याचं जेवण करते, त्या दिवशी घरात सगळे एकत्र येतात. पण आता शूटिंगमुळे घरी जात येत नाही. मला अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे ती म्हणजे आपल्या सणांकडे सुट्टी म्हणून बघू नका तर तेपारंपरिक पद्धतीने साजरे करा जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील.
आज पर्यंत रसिकप्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, घरच्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करेन.
 

शिवानी बावकर (शीतल) - (लागीर झालं जी )-गुढीपाडवा आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून पूजा करून गुढी उभारली जाते. घरी आई नैवेद्याचं जेवण करते, त्या दिवशी घरात सगळे एकत्रयेतात.शाळेत असताना माझी आज्जी म्हणायची तुला जो विषय कठीण जातो त्या विषयाचा अभ्यास नवीन वर्षात सुरु केला तर तो विषय सोपा जातो, म्हणून मी त्या दिवशी अभ्यास करायचे.माझा नवीन वर्षाचा संकल्प असा काही नाही, पण शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे व्हॉटसअप वर बोलणं जास्त होतं. पण व्हिडीओकॉल करून फोन वर बोलण्याचा नक्की प्रयत्न करेन

 

Web Title: TV actors will celebrate Gudi Padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.