"कोव्हिडच्या काळात भाड्याचं घर सोडलं आणि त्या रात्री...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भावुक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:29 AM2024-05-28T10:29:19+5:302024-05-28T10:30:13+5:30

काही दिवसांपूर्वीच अदितीने मायनगरी मुंबईत घर घेतल्याचं सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितलं होतं. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अदितीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

tv actress aditi dravid shared emotional post after buys home in mumbai | "कोव्हिडच्या काळात भाड्याचं घर सोडलं आणि त्या रात्री...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भावुक प्रसंग

"कोव्हिडच्या काळात भाड्याचं घर सोडलं आणि त्या रात्री...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भावुक प्रसंग

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांनी दिली. मुंबईत येऊन त्यांचं स्वप्न साकार करणाऱ्या अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अदिती द्रविड. काही दिवसांपूर्वीच अदितीने मायनगरी मुंबईत घर घेतल्याचं सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितलं होतं. अदितीने गृहप्रवेशाचे फोटोही शेअर केले होते. आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अदितीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर अदितीने मुंबईतील एका बिल्डिंगमध्ये आठव्या मजल्यावर घर खरेदी केलं आहे. अदितीने इन्स्टाग्रामवरुन घराच्या नेमप्लेटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने एक भावुक किस्सा शेअर केला आहे. 

अदिती द्रविडची पोस्ट

२०१५ ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंटने,रुमवर ,शेयरिंगमध्ये,रुममेट्ससोबत...सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता! २०१९ मध्ये एक शॉर्टफिल्म शूट करत होते. Covid चा काळ असल्याने तेव्हा रेंटचं घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकअप होताना समजलं की अजून एक दिवस शूट वाढलं आहे! अणि कोणतीही alternative सोय करायचा आत दिग्दर्शक "PACKUP” म्हणाले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला सेट पूर्ण रिकामा झाला! 

 

बरीच रात्र झाली होती,काय करावं काही सुचेना! मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचण कळताच क्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली! @soum1980 @rewatilimaye i will forever be grateful to you guys!
पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःचं घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं! त्यानंतर ४ वर्ष गेली,कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आज Finally हे घडतयं! 

हे पूर्ण झालंय यावर माझा विश्वास बसत नाहीये. या प्रवासात माझ्याबरोबर असणाऱ्या प्रत्येकाला थँक्यू. खरं म्हणतात, मुंबई सपनों का शहर हैं! आणि मी पुन्हा मुंबईच्या प्रेमात पडत आहे 🩷🩵🧿

अदितीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अदितीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मालिकांबरोबरच नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. अदिती 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे चर्चेत आली होती. 'बाईपण भारी देवा'मधील 'मंगळागौर' हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. हे गाणं अदितीने लिहिलं आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

Web Title: tv actress aditi dravid shared emotional post after buys home in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.