मुलांना lipkiss केल्यावरुन ट्रोल झाली अभिनेत्री, आणखी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:33 IST2023-03-15T16:31:27+5:302023-03-15T16:33:12+5:30
टीव्हीअभिनेत्री छवि मित्तलचे तिच्या मुलांना lipkiss करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मुलांना lipkiss केल्यावरुन ट्रोल झाली अभिनेत्री, आणखी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
टीव्ही अभिनेत्री छवि मित्तल (Chhavi Mittal) सध्या चर्चेत आहे ते तिच्या मुलांसोबतच्या फोटोंमुळे. अभिनेत्री तिच्या मुलांना lipkiss करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलही केले. तर याच ट्रोलिंगला छवी मित्तलने रोखठोक उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री छवि मित्तलने १२ दिवसांपूर्वी एक युट्युब व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओचा थंबनेल (Thumbnail) फोटो नेटकऱ्यांना पटला नाही. यात ती तिच्या लहान मुलांना lipkiss करताना दिसत आहे. 'मुलाला अशा प्रकारे कोणी किस करतं का' असा सवाल तिला नेटकरी विचारत आहेत. यावर आता छविने कडक शब्दात उत्तर दिलं आहे.
छवि मित्तलने मुलांना kiss करतानाचे आणखी काही फोटो आणि एका ट्रोलरची कमेंट पोस्ट करत लिहिले, 'हे अकल्पनीय आहे. एका आईने तिच्या मुलांवर कसं प्रेम करावं यावर दुसऱ्यांना कशी काय आपत्ती असू शकते. जे लोक माझ्या बाजुने कमेंट करत आहेत ते मलाच नाही तर माणुसकीला पाठिंबा देत आहेत. प्रेम. माझ्या दोन्ही मुलांच्या ओठांवर kiss करतानाचे आणखी काही फोटो आता मी पोस्ट करत आहे कारण त्यांच्यावर प्रेम करण्याला कोणत्यात सीमा नाहीत. मी त्यांना प्रेम दाखवण्यात काहीच गैर नाही हे शिकवत आहे आणि ते ही तसेच वागत आहेत. उलट मी त्यांना इतरांना दुखवू नका हे शिकवते. विशेषत: त्यांना ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे. मला कमेंटमध्ये जाणून घ्यायला आवडेल की आई वडिलांच्या रुपात तुमची प्रेमाची भाषा काय आहे. मला सांगा!'
छवि मित्तलच्या या पोस्टवर अनेक जण तिला पाठिंबाही देताना दिसत आहेत. तर लाफ्टर क्वीन भारती सिंग (Bharti Singh) हिनेही अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. छविने 'नागीन', 'एक चुटकी आसमान', 'बंदिनी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.