टीव्ही अभिनेत्रीच्या केसांना लागली आग, मालिकेच्या सेटवर घडली दुर्घटना; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:21 IST2023-12-19T17:21:15+5:302023-12-19T17:21:39+5:30
केसांना आग लागल्याचं तिला कळलंच नाही

टीव्ही अभिनेत्रीच्या केसांना लागली आग, मालिकेच्या सेटवर घडली दुर्घटना; Video व्हायरल
टीव्ही अभिनेत्री छवि मित्तल (Chhavi Mittal) ही हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर कायम आपले अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला असून तो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. छविच्या केसांना चुकून आग लागते. यात तिचे केस थोडे जळालेही आहेत. याचा लाईव्ह व्हिडिओ तिने स्वत:च पोस्ट केला आहे.
छवि मित्तल सध्या एका मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्यंतरी ती तिच्या आजारपणामुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा कामात व्यस्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या केसांना अचानक आग लागल्याचं दिसतं. तेवढ्यात कोणीतरी पटकन हातानेच मारत आग विझवतं.छवि म्हणते,'मला काहीतरी जळायचा वास येतच होता. माझे केस तर नाही जळाले? तेव्हा तिला सांगितलं जातं की तुझ्या केसांनाच आग लागली. ती बघते तेव्हा शॉक होते कारण तिचे थोडे केस डॅमेज झालेले दिसतात. छविने लिहिले, 'सेटवर अपघात होत राहतात. पण माझ्या केसातच आग लागणं हे फारच भीतीदायक होतं. व्हिडिओ चुकून कॅमेऱ्यातही कैद झाला. करण ग्रोवर थँक्यू तुझ्या तू धाडसीपणाने हातांनी आग झटकत मला वाचवलं.'
या व्हिडिओवर करण ग्रोवरनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो लिहितो,'आधी मला वाटलं तू हॉट आहेस ना म्हणून आग लागली पण नंतर कळलं की मेणबत्ती आहे.' यावर छवि सुद्धा हसतच थँक्यू अशी प्रतिक्रिया देते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही शॉक झाल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही जणांनी छविवर नाराजी व्यक्त केली आहे. 'तुझ्या केसांना आग लागते आणि तुला कळतंच नाही?' असा प्रश्न तिला विचारला आहे,