'द केरळ स्टोरी' पाहून देवोलिना म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम...", युझरच्या ट्वीटला दिलं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:10 AM2023-05-14T09:10:02+5:302023-05-14T09:11:07+5:30

'द केरळ स्टोरी' सिनेमावर ट्विटरवर एका युझरने ट्वीट केले आणि त्या ट्वीटला देवोलिनाने रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

tv actress devoleena bhattacharjee speaks clearly about her muslim husband | 'द केरळ स्टोरी' पाहून देवोलिना म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम...", युझरच्या ट्वीटला दिलं स्पष्ट उत्तर

'द केरळ स्टोरी' पाहून देवोलिना म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम...", युझरच्या ट्वीटला दिलं स्पष्ट उत्तर

googlenewsNext

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा बॉलिवूड सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. केरळच्या अनेक मुली लव्हजिहादला बळी पडतात यावर चित्रपट आधारित आहे. ही एक सत्यघटना आहे. अशा संवेदनशील विषयावरील चित्रपटावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी चित्रपटाला पाठिंबा देत आहे तर काही राज्यात सिनेमावर थेट बंदीच घालण्यात आली आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वीच जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केलं. माझा पती मुस्लिम असल्याचं सांगत तिनेही चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

'द केरळ स्टोरी' सिनेमावर ट्विटरवर एका युझरने ट्वीट केले आणि त्या ट्वीटला देवोलिनाने रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 incognito नावाच्या युझरने ट्वीट करत लिहिले,"माझ्या सहकाऱ्याची मैत्रिण निधीचा दुसऱ्या धर्माचा बॉयफ्रेंड होता. तिने सहजड तिच्या बॉयफ्रेंडला केरळ स्टोरी बघण्याबाबत विचारलं. तर त्याने फक्त नकार दिला नाही तर तिच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा आरोपही केला आणि तिचा छळ केला. ती घाबरली आणि त्याला विचारलं की तू कसं काय माझ्याशी असं बोलू शकतो मी जर इस्लामोफोबिक असते तर मुस्लिमला डेटच नसतं केलं. तर यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणाला, मग धर्मांतर कर आणि माझ्याशी लग्न कर. ती तयार झाली. पण ती तिच्या मैत्रिणीसोबत सिनेमा बघायला गेली.सिनेमा बघितल्यानंतर तिचे डोळे उघडले आणि तिने बॉयफ्रेंडसोबत नातं संपवलं. सिनेमाचा हा परिणाम समाजात दिसून येत आहे. म्हणूनच अनेक जण सिनेमावर बंदी घालत आहेत कारण लोक जागृत होत आहेत."

या ट्वीटवर देवोलिना म्हणाली,"असं प्रत्येकाबाबतीत घडत नाही. माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत सिनेमा बघायला आला. त्याने सिनेमाची स्तुती केली. त्याने नाही सिनेमाबद्दल काही आक्षेपार्ह शब्द काढले आणि नाही  तो त्याच्या धर्माविरुद्ध बोलला. मला वाटतं प्रत्येक भारतीयाने असं असायला हवं."

देवोलिनाच्या या ट्वीटवरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे समाजात हिंदु मुस्लिम वारं पुन्हा वाहू लागलं आहे. प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याचे पडसाद ठिकठिकाणी दिसत आहेत.

Web Title: tv actress devoleena bhattacharjee speaks clearly about her muslim husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.