Dipika Kakar : "पैसे नसल्याने ऑडिशनला पायी जायचे, 2 वेळचं जेवणंही कठीण"; दीपिका कक्करचा संघर्षमयी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 04:54 PM2023-06-06T16:54:52+5:302023-06-06T17:15:37+5:30
Dipika Kakar : दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती. पण तब्येत बिघडल्याने तिने हे करिअर सोडणच योग्य मानलं. यानंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग पत्करला आणि येथे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
दीपिका कक्कर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. 'ससुराल सिमर का' आणि 'कहां हम कहाँ तुम' सारख्या शोमधून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण तिची सुरुवात अजिबात सोपी नव्हती. ETimes ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, तिने तिच्या संघर्षाचे दिवस आठवले आणि PG मध्ये कशी जगली ते सांगितलं. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती. पण तब्येत बिघडल्याने तिने हे करिअर सोडणच योग्य मानलं. यानंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग पत्करला आणि येथे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
पैशांची चणचण असल्यामुळे अनेकवेळा तिला ऑडिशनसाठी चालत जाव लागलं. तिच्या संघर्षाच्या दिवसांत ती अशा फ्लॅटमध्ये राहायची ज्यामध्ये ना बेड होता ना पडदे. ती कशीतरी दिवस काढत होती. दीपिका म्हणाली, "मला आठवतं की, मी एअर होस्टेसच्या नोकरीसाठी मुंबईत आले होते तेव्हा माझ्याकडे एक सुटकेस आणि एअरबॅग होती. मी मुंबईत एका स्वस्त पीजीमध्ये राहिले आहे जिथे एका खोलीत चार ते पाच मुली राहत होत्या. त्यावेळी चांगलं घर घेण्याइतके पैसे नव्हते. मुलींना 12-15 हजारांची नोकरी असायची, त्यात जेवण, प्रवास, भाडे, ट्रेनिंग आणि मेकअपचा खर्च भागवणे कठीण होतं."
"जेव्हा तुम्ही घरापासून दूर असता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी स्वतः कराव्या लागतात, अशावेळी दोन वेळचं जेवणं करणं कठीण होतं. मी बाहेर पडताना ऑटोरिक्षाच्या मीटरवर लक्ष ठेवायचं. माझ्याकडे किती पैसे आहेत हे मला माहीत होतं. मीटरने तेवढे पैसे दाखवताच मी लगेच ऑटो थांबवायची आणि पुढचा प्रवास पायीच करायची." दीपिका म्हणाली, "एक वेळ आली जेव्हा मी पीजीमध्ये राहून अस्वस्थ होते आणि माझी आईही माझ्यासोबत शिफ्ट झाली. माझ्या घरात त्रास सुरू होता, म्हणून आईने माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आईसोबत पीजीमध्ये राहणे खूप अवघड होतं."
"मी एका कॉलनीत 6500 रुपयांमध्ये एक BHK घर भाड्याने घेतलं. तोपर्यंत माझ्याकडे काहीच नव्हतं. 15-20 दिवस माझा पगारच आला नाही. आम्ही फ्रीज,गॅस, स्टोव्ह आणि इतर वस्तुंशिवाय इतके दिवस काढले. आम्ही आमचे दुपट्टे पडद्याच्या जागी लावले होते. हळूहळू मी सामान खरेदी करायला सुरुवात केली. मी एक छोटासा स्टोव्ह विकत घेतला ज्याला एक सिलिंडर जोडला होता पण तो 10 दिवसांपेक्षा जास्त काळ चालायचाच नाही. त्या दिवसांत तो सिलिंडर दादरलाच रिफिल केला जायचा, म्हणून मी तिथे पायी जायचे. मला मुंबईच्या बसेसचा फोबिया होता. त्यामुळे मी बसने प्रवास करणं टाळायचे."
दीपिकाने सांगितले की, "लोकप्रिय टीव्ही शो केल्यानंतरही शोएब आणि तिने कठीण दिवस पाहिले आहेत. विशेषतः लग्नाच्या काळात त्यांनी खूप वाईट टप्पा पाहिला आहे. आर्थिक चढ-उतार हा जीवनाचा एक भाग आहे आणि ते तुम्हाला कधीही गाठू शकतो. जर तुम्ही पुढे जाऊन योग्य गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनता. याआधी जे काही घडलं ते बघून आम्हाला समाधान वाटतं की आता आमच्या डोक्यावर छप्पर आहे आणि आता आम्ही आमचे स्वप्नातील घर बांधत आहोत पण आम्ही आमचा संघर्ष आणि कठीण प्रसंग विसरलो नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.