'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:07 PM2024-06-14T14:07:28+5:302024-06-14T14:08:34+5:30

हटके व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

tv actress Drashti Dhami pregnant after 9 years of marriage giving birth at the age of 38 | 'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म

'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म

'मधुबाला' फेम अभिनेत्री दृष्टी धामी (Drashti Dhami) लग्नानंतर 9 वर्षांनी गरोदर राहिली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर नवऱ्यासोबत व्हिडिओ शेअर करत हटके पद्धतीने ही गुडन्यूज दिली. दृष्टी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता ती आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ती पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

दृष्टी धामाने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. ती नेहमीच पतीसोबत रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असते. दृष्टी आणि नीरजची जोडी लोकांना खूप आवडते. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकदा दृष्टीला गुडन्यूज कधी देणार असे प्रश्न विचारले गेले. आता ९ वर्षांनी तिने गुडन्यूज देत चाहत्यांनाही खूश केले. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये दोघांनी व्हाईट टीशर्ट घातला आहे. त्यांच्यात हातात ड्रिंकचा ग्लास आहे. तसंच त्यांनी एक पोस्टर धरलं आहे ज्यावर लिहिलं आहे की गुलाबी किंवा निळा काहीही असू शकतं. आम्हाला हेच माहितीये की ऑक्टोबर महिन्यात ते समोर येणार आहे. आजूबाजूला त्यांचे कुटुंबीयही हटके पद्धतीने सेलीब्रेशन करताना दिसत आहेत. 



 दृष्टी आणि नीरजवर सगळे अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री रुबिना दिलाईकही काही महिन्यांपूर्वीच आई झाली. तिनेही कमेंट करत दृष्टीला शुभेच्छा दिल्या. 'नवीन मॉमी स्टफ साठी मी आहेच' असंही ती म्हणाली.

दृष्टी धामीने 'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने 'द एम्पायर','दुरंगा' या वेबसीरिजमध्येही भूमिका साकारली आहे.

Web Title: tv actress Drashti Dhami pregnant after 9 years of marriage giving birth at the age of 38

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.