धक्कादायक! ३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली- "उपचार सुरु झालेत, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:41 PM2024-06-28T12:41:00+5:302024-06-28T12:41:38+5:30

Hina Khan : हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे. 

tv actress hina khan dignosed with stage 3 breast cancer shared emotional post | धक्कादायक! ३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली- "उपचार सुरु झालेत, पण..."

धक्कादायक! ३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली- "उपचार सुरु झालेत, पण..."

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. या मालिकेने हिना खानला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, हिना खानच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे. 

३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर 

माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या चाहत्यांबरोबर मला एक बातमी शेअर करायची आहे. मला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मी स्ट्राँग आहे आणि आजारातून बरी होणार आहे. यावर मी उपचार घेत असून यातून पूर्णपणे बरी होण्यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. 

 

या काळात मला थोडी प्रायव्हसी हवी आहे. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि ताकदीची मला पूर्ण जाणीव आहे. या प्रवासातून जाताना मला तुमचे अनुभव आणि पाठिंब्याचा नक्कीच उपयोग होईल. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर सकारात्मक राहीन. यातून मी पूर्णपणे बरी होईन याचा मला विश्वास आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादांची मला गरज आहे

हिनाच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आणि लवकर बरं होण्याच्या कमेंट केल्या आहेत. हिना खानने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. हिनाने अनलॉक, डॅमेज या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 
 

Web Title: tv actress hina khan dignosed with stage 3 breast cancer shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.