'मिले जब हम तुम' फेम अभिनेत्रीचा संसार मोडला, 7 वर्षांनी घेतला घटस्फोट; कारण सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:15 PM2024-08-26T15:15:12+5:302024-08-26T15:16:17+5:30
अभिनेत्रीला ५ वर्षांची एक मुलगीही आहे.
टीव्ही अभिनेत्री नविना बोले (Navina Bole) अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली. 'इश्कबाज ', 'मिले जब हम तुम' या मालिकांमधील तिच्या भूमिका लक्षात राहिल्या. MJHT मध्ये तिने दिया ही भूमिका साकारली होती. नविनाने नुकतंच तिचा घटस्फोट झाल्याचा खुलासा केला. पती जीत करनानीपासून तीन महिन्यांपूर्वीच वेगळी झाली आहे. त्यांना ५ वर्षांची एक मुलगीही आहे. घटस्फोटानंतर दोघं मिळून लेकीचं को पॅरेंटिग करणार आहेत.
अभिनेत्री नविना बोलेचा 7 वर्षांचा संसार मोडला. तीन महिन्यांपूर्वीच ती पतीपासून वेगळी झाली. सध्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. याचा खुलासा करताना ती म्हणाली, "आमची 5 वर्षांची मुलगी किमायराचा मिळून सांभाळ करणार आहोत. प्रत्येक आठवड्यात दोन दिवस ती जीत जवळ असेल. आम्ही आपसी सहमतीने हा निर्णय घेतला आहे. एकत्र भांडत राहण्यापेक्षा एकमेकांशिवाय आम्ही जास्त चांगलं आयुष्य जगू असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला."
ती पुढे म्हणाली, "किमायरासाठी आम्ही हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. लग्नाच्या सुरुवातीला आमच्यात सगळं काही सुरळीत होतं पण हळूहळू गोष्टी बिघडल्या. संसारात संवाद आणि एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम घालवणं खूप गरजेचं असतं. हे आमच्यात कमी पडल्याने शेवटी आम्ही या निर्णयापर्यंत आलो."
नविनाचा पती जीत करनानी हा आर्थिक सल्लागार आहे. त्याने अद्याप घटस्फोटावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. हा वैयक्तिक विषय असून आम्हाला प्रायव्हसी द्यावी अशी त्याने विनंती केली आहे. 2017 साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. तर 2019 साली किमायराचा जन्म झाला.