शूटिंग सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका, थोडक्यात वाचली निया शर्मा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:53 AM2024-09-06T11:53:19+5:302024-09-06T11:54:20+5:30

'सुहागन चुडैल' मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना आगीचा भडका उडाला. या अपघातात निया थोडक्यात बचावली.

tv actress nia sharma escape from fire accident on suhagan chudail serial set watch video | शूटिंग सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका, थोडक्यात वाचली निया शर्मा, नाहीतर...

शूटिंग सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका, थोडक्यात वाचली निया शर्मा, नाहीतर...

निया शर्मा हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'जमाई राजा', 'एक हजारो मे मेरी बहना है', 'इश्क मे मरजावा', 'नागिन', 'तेरे इश्क मे घायल' या मालिकांमधये तिने काम केलं आहे. सध्या निया 'सुहागन चुडैल' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत असून चुडैलचं पात्र साकारत आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच एक मोठा अपघात होता होता राहिला. 

'सुहागन चुडैल' मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना आगीचा भडका उडाला. या अपघातात निया थोडक्यात बचावली. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करत हा प्रसंग चाहत्यांना सांगितला आहे. नियाने सेटवरील शूटिंगदरम्याने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओत शूटिंगदरम्यानच अचानक आग लागल्याचं दिसत आहे. हातात मशाली घेऊन असलेल्या काही लोक नाचताना दिसत आहेत. त्यांच्यामधून निया बाहेर येताना दिसत आहे. ती बाहेर येताच समोरुन आगीचा भडका तिच्या थेट तोंडावर आल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 


निया पटकन खाली वाकल्याने सुदैवाने तिला यामध्ये तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. हा व्हिडिओ शेअर करत नियाने "त्यांनी म्हटलं lit आणि खरंच आग लागली", असं कॅप्शन दिलं आहे. नियाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय अभिनेत्रीला काळजी घेण्याच्या कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत. निया 'सुहागन चुडैल'बरोबरच लाफ्टर शेफमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: tv actress nia sharma escape from fire accident on suhagan chudail serial set watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.