नकार देऊनही सतत इंटिमेट सीन्सच ऑफर झाले, हातातून गेले बरेच प्रोजेक्ट्स; अभिनेत्रीची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:58 IST2025-03-20T11:57:11+5:302025-03-20T11:58:22+5:30
मी नेहमीच या सीन्सला नकार दिला आहे. तरी देखील मेकर्स मला...अभिनेत्रीचा खुलासा

नकार देऊनही सतत इंटिमेट सीन्सच ऑफर झाले, हातातून गेले बरेच प्रोजेक्ट्स; अभिनेत्रीची खंत
आजकाल ओटीटीवरील कंटेंटमध्ये हमखास इंटिमेट सीन्स असतात. असे खूपच कमी प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये बोल्ड किंवा किसींग सीन्सशिवाय कथानक पूर्ण होतं. 'पंचायत' किंवा नुकतीच रिलीज झालेली 'दुपहिया' सीरिज त्याला अपवाद आहे. दरम्यान इंटिमेट सीन्सला नकार देऊनही सतत तशाच भूमिका ऑफर झाल्याने बरेच प्रोजेक्ट हातातून गेल्याचा खुलासा नुकताच एका अभिनेत्रीने केला.
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाने (Pavitra Punia) अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'तेनाली रामा' मालिकेत दिसत आहे. इंटिमेट सीन्समुळे पवित्राने अनेक वेबसीरिजला नकार दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा म्हणाली, "अनेकवेळा बऱ्याच वेब सीरिजसाठी माझा विचार सुरु होता. पण त्यात इंटिमेट सीन्सही होते. मी नेहमीच या सीन्सला नकार दिला आहे. तरी देखील मेकर्स मला अशाच भूमिकांसाठी विचारणा करतात. मला याचं खूप वाईट वाटतं. मी असे सीन्स करण्यासाठी कंफर्टेबल नाही हे समजून घेणं एवढं कठीण का आहे? अशा सीन्समुळे माझ्या हातून अनेक वेबसीरिज गेल्या आहेत."
ती पुढे म्हणाली, "असं असलं तरी मी माझ्या टीव्ही करिअरमध्ये पॉझिटिव्ह आहे. माझे टीव्हीवर अनेक प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. सध्या तेनाली राममध्ये माझं चांगलं काम सुरु आहे. यात मी विशकन्या लैलाच्या भूमिकेत आहे. कामासाठी मला फार संघर्ष करावा लागला नाही. एकानंतर एक संधी मिळत गेली. टीव्ही आणि रिएलिटी शोज करणं मी सोडणार नाही."
पवित्रा पुनिया बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती. एमटीव्ही स्प्लिस्ट्सव्हिला ३ मध्येही ती होती. 'बालवीर' मधील भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. 'ये है मोहोब्बते' मालिकेतही ती झळकली होती.