‘जब वी मेट’चा सीन रिक्रिएट करणे श्वेता तिवारीला पडले महाग; झाला अपघात, भाजला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:10 AM2020-03-13T10:10:42+5:302020-03-13T10:11:10+5:30
सेटवर शूटींग सुरु असताना एक अपघात झाला आणि श्वेता तिवारीचा हात भाजला.
‘मेरे डॅड की दुल्हन’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तूर्तास या मालिकेच्या सेटवर अपघात झाल्याचे वृत्त आहे. सेटवर शूटींग सुरु असताना एक अपघात झाला आणि श्वेता तिवारीचा हात भाजला.
खरे तर या घटनेला बरेच दिवस झालेत. पण आत्ता कुठे या घटनेचा खुलासा झाला. मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता फहमान खानने याबद्दल माहिती दिली.
‘मेरे डॅड की दुल्हन’ मालिकेतील अभिनेता फहमान खान आणि श्वेता तिवारी ‘जब वी मेट’ या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करत होते. ‘जब वी मेट’मध्ये गीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोटो जाळून तो फ्लश करते असा सीन आहे. असाच सीन ‘मेरे डॅड की दुल्हन’ मालिकेत रिक्रिएट करण्याचे ठरले. यात श्वेता तिच्या डेटचा संपूर्ण राग व्यक्त करण्यासाठी तिची साडी आणि स्कार्फ जाळते.
फहमानने सांगितले की, हा सीन शूट होत असताना सेटवर चांगलीच मस्ती सुरु होती. पण अचानक पडद्यांना आग लागली आणि श्वेता आग विझवण्याचे प्रयत्न करू लागली. या प्रयत्नांत तिचा हात भाजला. आम्हा सर्वांना श्वेता सीनमध्ये जीव ओतण्यासाठी आग विझवतेय, असे वाटले. पण तिचा हात चांगलाच भाजला होता.
श्वेता तिवारी अनेक मालिका आणि शोमध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या 4 सीझनची ती विजेतीसुद्धा आहे. तिच्या खासगी आयुष्यातही तिने बरेच चढउतार पाहिले आहेत. राजा चौधरीसोबतचे लग्न मोडल्यानंतर 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केले होते. त्यानंतर अभिनवसोबतचा तिचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता.