लग्नानंतर एक वर्षाच्या आतच अशी का झाली अभिनेत्रीची अवस्था? म्हणाली, "माझ्या पतीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:32 IST2025-02-05T15:30:26+5:302025-02-05T15:32:05+5:30
लग्नानंतर आलेल्या चढ उतारांवर केलं भाष्य

लग्नानंतर एक वर्षाच्या आतच अशी का झाली अभिनेत्रीची अवस्था? म्हणाली, "माझ्या पतीला..."
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) गेल्यावर्षीच लग्नबंधनात अडकली.'इश्कबाज' मधून घराघरात पोहोचलेल्या सुरभीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात बॉयफ्रेंड करण शर्मासह सातफेरे घेतले. लग्नानंतर काही महिन्यांनी आता तिने एक शॉकिंग फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा चेहरा सुजला असून डोळ्यातून घळघळा पाणी येत आहे. तिला नक्की काय झालं आणि नवऱ्याबद्दल ती काय म्हणाली वाचा.
सुरभी चंदना आणि करण शर्मा १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचा चेहरा, डोळे सुजले असून डोळ्यातून अश्रूही येत आहेत. तिने पोस्टमध्ये लग्नानंतर आलेल्या चढ-उतारांबद्दल सांगितलं आहे. ती लिहिते, "सावधान: माझ्या पतीला काही बोलू नका. तो मला रडवत नाही तर उलट हसवण्याचा प्रयत्न करतोय. मला चिअर करण्यासाठी फोटोही त्यानेच क्लिक केला आहे. हा फोटो माझ्या मोबाईलच्या गॅलरीत होता. मला माहित होतं की आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढचा रस्ता फूल आणि काट्यांनी भरलेला असणार आहे. एक महिन्यात आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे त्यामुळे मला वेगळंच वाटतंय. नवरा बायको म्हणून हे कधीच सोपं नसतं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून जर तुम्ही अॅडजस्ट करत असाल तर सगळं सोपं असतं."
ती पुढे लिहिते, "लग्नानंतर मला आईवडिलांची खूप आठवण आली. बऱ्याचदा मी वडिलांच्या आठवणीत रडायचे. लग्नानंतर जबाबदाऱ्या येतात ज्या कधी सांगितल्या जात नाहीत आणि तुम्हीही ज्यासाठी तयार नसता. तुम्ही एक जबाबदारी सांभाळतच असता तेवढ्यात एकानंतर एक रांगेत कामं येतात. आम्ही एकमेकांवर प्रेम केलं, मदत केली. जेव्हा आमच्या इच्छेनुसार गोष्टी घडल्या नाहीत तेव्हा एकमेकांना चिअर करण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात लग्नानंतरचं पहिलं वर्ष पूर्ण कठीण असतं. ठीकच आहे पार्टनरसोबत तुम्ही सारख्या पेजवर यायला हवं. आम्ही रोज नवीन ट्यून शोधत प्रत्येक क्षण जगत आहोत."