'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:22 IST2023-05-14T13:21:50+5:302023-05-14T13:22:53+5:30
पालघरमध्ये भजनलाल स्टुडिओ इथे अलीबाबा या मालिकेचा सेट होता.

'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनविश्व हादरलं होतं. 'अलीबाबा:दास्तान ए काबूल' (Alibaba : Daastan e kabul) मालिकेच्या सेटवरच तुनिषाने आत्महत्या केली तर तिचा सहकलाकार शिजान खान याला अटक करण्यात आली. सध्या शिजान जामिनावर बाहेर आहे. मालिकेची स्टोरी लाईन बदलून दुसरे पात्र घेण्यात आले आणि काही दिवसांनी मालिका सुरु झाली. आता याच मालिकेच्या सेटवरुन आणखी एक बातमी आली आहे. मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे..
पालघरमध्ये भजनलाल स्टुडिओ इथे अलीबाबा या मालिकेचा सेट होता. काल १३ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास सेटला आग लागली आणि काही क्षणात सेट जळून खाक झाला. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरु आहे. मात्र आता 'अलीबाबा'चा सेट उद्धवस्त झाला आहे. याच सेटवर काही महिन्यांपूर्वी तुनिषाने मेकअपरुम मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तुनिषाच्या आत्महत्येला तिचा सहकलाकार शिजान खान जबाबदार आहे असे आरोप लावले गेले. त्यानेच तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले या संशयावरुन त्याला अटकही करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे.