'या' अभिनेत्रीने लग्जरी कार सोडून चक्क रिक्षाच खरेदी केली, असा करते रोज प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 15:23 IST2019-08-28T15:19:29+5:302019-08-28T15:23:29+5:30
यशाश्री मसुरकर रंग बदलती ओढ़नी', 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत झळकली आहे.

'या' अभिनेत्रीने लग्जरी कार सोडून चक्क रिक्षाच खरेदी केली, असा करते रोज प्रवास
अभिनयक्षेत्रात काम करणा-या कलाकारांची लाइफस्टाइलचा नुसता विचार जरी केला तरी आपण त्यांच्या लॅविश लाइफस्टाइलचा अंदाजा लावू शकतो. आलिशान मोठी घरं आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन पाहून आपण थक्क होतो. मात्र असेही काही कलाकार आहेत. साधं राहणीमन जास्त आवडतं. अगदी त्यानुसारच ते राहतात. टीव्ही अभिनेत्री यशाश्री मसुरकरने आलिशान गाडी खरेदी न करता चक्क रिक्षाच विकत घेतली आहे. यशाश्री ' रंग बदलती ओढ़नी', 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत झळकली आहे.
यशाश्रीला लक्झरी गाड्यांमध्ये फिरण्यापेक्षा रिक्षानेच फिरायला जास्त आवडते. शूटिंगच्या वेळी ती मालिकेच्या सेटवर रिक्षानेच प्रवास करते. मुळात रिक्षाने प्रवास केला तर वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होते. त्यातच गाडीसाठी एक वेगळा ड्रायव्हर ठेवा ते सगळे काही खूप खर्चीकही असते. तसेच ते नको असलेले ट्रॅफिकमुळे त्या गाडीत तासन् तास अडकण्यापेक्षा मला रिक्षानेच प्रवास करायला आवडते असे तिने सांगितले आहे. कशाचाही विचार न करता तिने म्हणून रिक्षाच खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
मुळात यशाश्रीला ही आयडीयाची कल्पना तिचा परदेशी मित्र डेन्मार्कवरून थेट मुंबईला सायकलवरून आला होता. डेन्मार्क ते मुंबई प्रवासासाठी त्याला 1 वर्ष 6 महीने इतका कालावधी लागला होता. त्याची कहाणी तिला इतकी प्रेरणादायी वाटली की तिने रिक्षाने मुंबई ते आगरा असा प्रवास केला. यशाश्री 10 वर्षापासून अभिनयक्षेत्रात काम करत आहे. मात्र चांगल्या कामाच्या शोधात असणारी यशाश्री सध्या रेडीओ जॉकी म्हणून काम करत आहे. रेडीयो जॉकी म्हणून काम करण्यातही एक वेगळीच मजा येत असल्याचे तिने म्हटले आहे.