Video: 'सामी सामी' वर थिरकली अनुपमाची पावलं; एकदा नक्की पाहा रुपाली गांगुलीचा साऊथ स्टाइल डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:03 IST2022-06-13T18:02:11+5:302022-06-13T18:03:07+5:30
Rupali Ganguly: या व्हिडीओमध्ये रुपाली सामी गाण्यावर डान्स करत असून अनुजची भूमिका साकाणाऱ्या गौरव खन्नाने तिची साथ दिली आहे.

Video: 'सामी सामी' वर थिरकली अनुपमाची पावलं; एकदा नक्की पाहा रुपाली गांगुलीचा साऊथ स्टाइल डान्स
काही महिन्यापूर्वी 'पुष्पा' (pushpa) या दाक्षिणात्य चित्रपटाने प्रेक्षकांना अशरक्ष: वेडं केलं होतं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातलं 'सामी' हे गाणं तुफान व्हायरल झालं. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ शेअर केले होते. विशेष म्हणजे याच गाण्यावर आता अनुपमाने भन्नाट डान्स केला आहे. तिच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली सामी गाण्यावर डान्स करत असून अनुजची भूमिका साकाणाऱ्या गौरव खन्नाने तिची साथ दिली आहे. हा व्हिडीओ स्टार परिवार या कार्यक्रमातील असल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये रुपालीने लाल रंगाची साडी नेसली असून ती सामीची हूक स्टेप करत आहे. विशेष म्हणजे रुपालीचा हा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.