सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:22 AM2024-06-27T10:22:08+5:302024-06-27T10:23:32+5:30

गेल्या वर्षी अभिनेत्री बुर्खा घालून दुबईच्या मशिदीत गेली होती. तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं.

tv couple Jasmine Bhasin and Aly goni marriage plans interreligious marriage after sonakshi sinha | सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) दोन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज केलं. आंतरधर्मीय विवाह केल्याने सोशल मीडियावर सोनाक्षीला खूप ट्रोल करण्यात आलं. सुरुवातीला सोनाक्षीच्या कुटुंबियांचाही लग्नाला विरोध होता अशी चर्चा झाली. लग्नानंतर सोनाक्षीने सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले पण कमेंट सेक्शनच ऑफ ठेवलं. सोनाक्षीनंतर आता आणखी एक अभिनेत्री आंतरधर्मीय विवाह करणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून ती अभिनेत्याला डेट करत आहे. नुकतंच त्या अभिनेत्याने त्यांच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सांगितलं.

सोनाक्षीनंतर आता टीव्हीवरचं हे लोकप्रिय कपल लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस 14' मध्ये असताना दोघं प्रेमात पडले आणि तेव्हापासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल आहे जॅस्मीन भसीन (Jasmine Bhasin) आणि अली गोनी (Aly Goni). नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत अलीने लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सांगितले. तो म्हणाला, "लग्न करायचंच आहे. आई मागे लागली आहे आता लग्न करा म्हणत आहे. जॅस्मीन आणि मी लग्नासाठी तयार आहोतच. कदाचित लवकरच आमच्या लग्नाची बातमी येईल." याचवर्षी लग्न करणार का? प्रश्नावर अली म्हणाला, "काहीही होऊ शकतं."

दुसरीकडे जॅस्मिनने मात्र एका मुलाखतीत आताच लग्नाचे काही प्लॅन्स नसल्याचं सांगितलं. सध्या तिला करिअरवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं ती म्हणाली. उद्या 28 जून रोजी जॅस्मीनचा वाढदिवस आहे. यानिमित्त कपल थायलंडला सुट्टी एन्जॉय करणार आहेत. गेल्या वर्षी जॅस्मीन बुर्खा घालून दुबईच्या मशिदीत गेली होती. तिचे फोटो पाहून तिला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं.

अली गोनीला 'ये है मोहोब्बते' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तर जॅस्मिन भसीनने 'दिल से दिल तक','नागिन 4' मालिकांमध्ये काम केलं. आता लवकरच ती पंजाबी सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: tv couple Jasmine Bhasin and Aly goni marriage plans interreligious marriage after sonakshi sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.