भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 02:39 PM2021-11-07T14:39:30+5:302021-11-07T14:40:31+5:30

Katrina kaif: सध्या सोशल मीडियावर 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना भर कार्यक्रमात अक्षयच्या कपड्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसून येत आहे. 

tv the kapil sharma show katrina kaif pulls legs of akshay kumar | भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

googlenewsNext

अक्षय कुमार (akshay kumar), रणवीर सिंग (ranveer singh), अजय देवगण (ajay Devgn) अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'सूर्यवंशी'(sooryavanshi) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला.  विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तुफान कमाई करणारा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना भर कार्यक्रमात अक्षयच्या कपड्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसून येत आहे. 

'सूर्यवंशी' प्रदर्शित होण्यापूर्वी कतरिना आणि अक्षय यांनी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. यावेळी ही जोडी द कपिल शर्मा या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाले होते. परंतु, हा शो सुरु असताना कतरिनाने अक्षयच्या कपड्यांची खिल्ली उडवली.

धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण
 

Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो
 

सध्या सोशल मीडियावर द कपिल शर्मा शोमधील एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  अक्षयने हुडी आणि पायजमा परिधान केल्याचं दिसून येत आहे. भर कार्यक्रमात अक्षय पायजमा परिधान करुन आल्यामुळे कतरिनाने त्याची खिल्ली उडवली आहे. 'अरे, तू घरचा पायजमा का घालून आला आहेस?', असा प्रश्न कतरिना अक्षयला विचारते.

दरम्यान, कतरिनाची री ओढत कपिलदेखील अक्षयची मस्करी करतो. परंतु, 'कपिलचा शो म्हणजे माझ्यासाठी घरच आहे', असं उत्तर अक्षय देतो.


 

Web Title: tv the kapil sharma show katrina kaif pulls legs of akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.