Bigg boss 17: अरमान मलिकच्या पत्नीने केली २ लाखांची खरेदी; शोमध्ये घेऊन जाणार 'या' महागड्या वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:29 IST2023-10-10T14:29:02+5:302023-10-10T14:29:27+5:30
Payal malik: पायलने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत तिने खरेदी केलेल्या वस्तू दाखवल्या आहेत

Bigg boss 17: अरमान मलिकच्या पत्नीने केली २ लाखांची खरेदी; शोमध्ये घेऊन जाणार 'या' महागड्या वस्तू
छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस (bigg boss). लवकरच या शोचं १७ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाशी निगडीत अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत. यामध्येच फेमस युट्युबर अरमान मलिक आणि त्याची पत्नी पायल मलिक ही जोडी सुद्धा या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पायलने जय्यत तयारी केली असून तिने लाखो रुपये खर्च करुन खरेदी केली आहे.
या कार्यक्रमात नेमके कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार यांची अधिकृत नाव अद्याप तरी समोर आलेली नाहीत. मात्र, तरीदेखील अरमान आणि पायल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यामध्येच पायलाचा एक डेली व्लॉग समोर आसा आहे. यामध्ये पायलने चक्क २ लाखांची खरेदी केल्याचं दिसून येतं.
पायलने बिग बॉस १७ च्या घरात जाण्यासाठी २ लाख रुपयांची खरेदी केली आहे. यात मेकअप प्रोडक्ट्सपासून अॅक्सिसिरीजपर्यंत अनेक गोष्टींची तिने खरेदी केली आहे. विशेष म्हणजे एका खास कारणासाठी ही खरेदी केल्याचं तिने सांगितलं आहे. परंतु, ते खास कारण काय हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. परंतु, ही शॉपिंग बिग बॉससाठी असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
दरम्यान, पायलपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने केलेली शॉपिंग चर्चेत आली होती. अंकिता सुद्धा बिग बॉस १७ मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ती या शोमध्ये तब्बल २०० ड्रेस सोबत घेऊन जाणार आहे.