'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 04:10 PM2021-12-15T16:10:50+5:302021-12-15T16:11:22+5:30

Aai kuthe kay karte: देशमुख कुटुंबात बऱ्याच घडामोडी घडल्या असून अरुंधतीने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसागणिक रंजक होताना दिसते.

tv serial aai kuthe kay karte avinash and arundhati discuss about ashutosh | 'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय

'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

पहिल्या भागापासून छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' ( aai kuthe kay karte). या मालिकेत आतापर्यंत अनेक रंगतदार वळणं आल्याचं पाहायला मिळालं आहे. देशमुख कुटुंबात बऱ्याच घडामोडी घडल्या असून अरुंधतीने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसागणिक रंजक होताना दिसते. अनिरुद्धपासून वेगळी झाल्यानंतर अरुंधती स्वतंत्रपणे राहू लागली आहे. त्यातच आता तिच्या आयुष्यात एक नवं नातं डोकावत आहे. मात्र, हे नवं नातं स्विकारावं की नाही या संभ्रमात अरुंधती असून अविनाश तिला एक मोलाचा सल्ला देणार आहे. 

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अविनाश, अरुंधतीशी आशुतोषसोबतच्या मैत्रीविषयी चर्चा करणार आहे. तसंच जर आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर त्याचा स्वीकार कर असंही अविनाश अरुंधतीला सांगणार आहे.

"तू काय करशील?..आई-आप्पा अजून ८-१० वर्ष..मी प्रॅक्टिकली बोलतोय..त्यानंतर वहिनी तुझं आयुष्य काय असेल?  तुझा हा एकटेपणा पुढे अधिकाधिक वाढत जाईल. माझी गोष्ट वेगळी आहे गं. मी पुरुष आहे जगभर एकटा फिरेन.  पण तुला तसं नाही करता येणार. मनात आलं आणि निघून गेलीस. म्हणूनच, अशा वयात तुला तुझ्या वयाच्या मित्रमंडळींची साथ मिळणं फार गरजेचं आहे. आशुतोष, देविका ही माणसं राहुदेत तुझ्या आयुष्यात. फार महत्त्वाची आहेत ती. त्यांची मैत्री तुझं एकटेपण कमी करणार आहेत. तुला जीवंत ठेवणार आहेत," असं अविनाश म्हणतो.

पुढे तो म्हणतो,"एक स्पष्टपणेच सांगतो वहिनी, आशुतोष जर मैत्रीचा हात पुढे करत असेल तर तो नाकारण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक नात्याला वेळ द्यावा लागतो ग वहिनी. आणि, मैत्रीचं नातं हे खूप छान असतं. कारण, त्यात कोणीही कोणाला जज करत नाही.  तुम्ही जसे आहात ना तसे तुमचे मित्र-मैत्रिणी तुम्हाला स्विकारतात आणि तिच जादू आहे.  आता बघं ना देविकासोबत असतांना तू जशी आहेस तशीच असतेस ना. त्यामुळे मग घरातल्यांच्या दडपणाखाली आशुतोषशी बोलणं बंद करु नकोस."

दरम्यान, आशुतोषसोबतची मैत्री घरात अनिरुद्धसह अनेकांना खटकत असल्यामुळे अरुंधती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. तसंच अरुंधतीचं त्याच्यासोबत काम करणंदेखील कुटुंबीयांना मान्य नाही. त्यामुळे वरचेवर अरुंधतीला घरातल्यांचे टोमणे ऐकावे लागतात. परंतु, या सगळ्यात अविनाश अरुंधतीच्या बाजूने उभा असून आशुतोषसोबत बिंधास्त मैत्री कर असा सल्ला तो तिला देता.
 

Web Title: tv serial aai kuthe kay karte avinash and arundhati discuss about ashutosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.