मधुराणीच्या वैवाहिक जीवनात वादळ?; घटस्फोटाच्या चर्चांवर पतीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:01 AM2023-07-21T11:01:59+5:302023-07-21T11:03:49+5:30

madhurani gokhale: मधुराणीच्या वैवाहिक जीवनात अनेक चढउतार येत असून लवकरच ती प्रमोद प्रभुलकर यांच्यापासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

tv serial aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale and pramod prabhulkar heading for a divorce | मधुराणीच्या वैवाहिक जीवनात वादळ?; घटस्फोटाच्या चर्चांवर पतीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

मधुराणीच्या वैवाहिक जीवनात वादळ?; घटस्फोटाच्या चर्चांवर पतीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

googlenewsNext

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर(madhurani gokhale-prabhulkar)  सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. मधुराणीच्या वैवाहिक जीवनात अनेक चढउतार येत असून ती लवकरच प्रमोद प्रभुलकर यांच्यापासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'इ टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आमच्या नात्यात कोणतेही चढउतार नसल्याचं सांगितलं आहे.

अलिकडेच सोशल मीडियावर मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर यांच्याविषयी एक पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. या पोस्टमध्ये मधुराणी तिच्या नवऱ्यापासून विभक्त होत असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर तिने काही दिवसांपूर्वी मिरॅकल अॅक्टिंग अकॅडमी सोडली त्यामुळे या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. मात्र, आता यावर प्रमोद प्रभुलकर यांनी मौन सोडलं आहे.

काय म्हणाले प्रमोद प्रभुलकर?

"सध्या सोशल मीडियावर आमच्याविषयी व्हायरल होत असलेल्या चर्चा या पूर्णपणे निराधार आहेत. या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. आम्ही दोघंही एकत्र आनंदी आहोत", असं ते म्हणाले

पुढे ते म्हणतात, "सोशल मीडियावर आमचा फोटो नसणं याचा अर्थ आमच्या नात्यात काही तरी प्रॉब्लेम्स आहेत असं नाही." दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मधुराणीने तिची मिरॅकल अॅक्टिंग अकॅडमी सोडली. ही अकॅडमी प्रमोद प्रभुलकर आणि तिने एकत्र सुरु केली होती. परंतु, अचानकपणे तिने तिच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या नात्यात काही तरी प्रॉब्लेम असल्याची चर्चा सुरु झाली. तसंच  मध्यंतरी मधुराणी तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. परंतु, यावेळी प्रमोद प्रभुलकर तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

Web Title: tv serial aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale and pramod prabhulkar heading for a divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.