छोट्या बयोची मोठी स्वप्न; बयो बांधू शकेल का आरवला राखी? मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:30 PM2023-08-29T17:30:00+5:302023-08-29T17:30:00+5:30

Tv serial: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये साजरं होणार आगळीवेगळे रक्षाबंधन

tv serial chotya bayochi mothi swapna bayo tie a rakhi to Aarav A new twist will come in the serial | छोट्या बयोची मोठी स्वप्न; बयो बांधू शकेल का आरवला राखी? मालिकेत येणार नवा ट्विस्ट

छोट्या बयोची मोठी स्वप्न; बयो बांधू शकेल का आरवला राखी? मालिकेत येणार नवा ट्विस्ट

googlenewsNext

सोनी मराठी ही वाहिनी कायम आपल्या प्रेक्षकांसाठी मालिकांच्या माध्यमातून काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे या मालिकांमध्ये कायम सण,उत्सव साजरे केले जात असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता सोनी मराठीवरील काही निवडक मालिकांमध्ये रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे.

 'तुजं माज सपान' मालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पुन्हा आपल्या घरी  जाणार आहे, तर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत मयुरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयुरीलाच राखी बांधताना पाहायला मिळणार आहे. मयुरी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करते आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेते आहे त्यासाठी चक्क भाऊसाहेबच मयुरीला राखी बांधून एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.

 'राणी मी होणार' या मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. एवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहे. रक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जाते. आता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईल, हे मालिकेत पाहायला मिळेल. 
 

Web Title: tv serial chotya bayochi mothi swapna bayo tie a rakhi to Aarav A new twist will come in the serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.