माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:26 AM2022-06-12T11:26:43+5:302022-06-12T11:27:20+5:30

Mazi tuzi reshimgath: नेहाच्या लग्नाची खबर मिळताच तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात येणार आहे.

tv serial mazi tuzi reshimgath Neha's first husband's entry in the wedding | माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट

माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट

googlenewsNext

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत सध्या यश आणि नेहा यांच्या आयुष्यात एका नव्या नात्याची सुरुवात होणार आहे.  देवाब्राह्मणाच्या साक्षीने आज (रविवार) नेहा आणि यश लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या या मालिकेत आनंदाचा वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांच्या नात्याला गालबोट लागणार आहे. लवकरच या मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री होणार आहे.

परीच्या जन्मापूर्वीच नेहाचा नवरा तिला एकटं सोडून गेला होता. तेव्हापासून नेहाने एकटीने परीचा सांभाळ केला. मात्र, आता या दोघींचं कुटुंब तिघांचं होणार आहे. आजोबांच्या परवानगीने नेहा आणि यश लग्नगाठ बांधणार आहेत. परंतु, नेहाच्या लग्नाची खबर मिळताच तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नेहा आणि यशच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये छापून येते. ही बातमी तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचते आणि तो लग्नात अडथळा आणण्यासाठी येतो. परंतु, नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, त्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेविषय़ी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.

Web Title: tv serial mazi tuzi reshimgath Neha's first husband's entry in the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.