ऑनस्क्रीन न पटणाऱ्या मायलेकीचं ऑफस्क्रीन आहे भन्नाट नातं; पाहा दिपा-कार्तिकीचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 03:43 PM2023-04-23T15:43:47+5:302023-04-23T15:44:29+5:30
ऑफस्क्रीन रेश्मा आणि अनुष्का यांच्यात चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla). ही मालिका सुरु होताच अल्पावधीत लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या मालिकेतील दिपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. सध्या या मालिकेत दिपाच्या आयुष्यात पुन्हा एकदा कार्तिकची एन्ट्री झाली आहे. मात्र, कार्तिकच्या येण्यामुळे तिला नवनवीन समस्यांना सामोरं जाव लागत आहे. इतकंच नाही तर तिची लेक कार्तिकीदेखील तिला त्रास देत आहे. मात्र, ऑनस्क्रीन जराही न पटणाऱ्या या मायलेकींचं ऑफस्क्रीन सुंदर नातं आहे. हे नुकतंच समोर आलं आहे
आपल्या आईमुळेच वडिलांना १४ वर्ष तुरुंगात रहावं लागलं असा समज करुन कार्तिकी दिपाचा वारंवार तिरस्कार करते. इतकंच नाही तर तिला संधी मिळेल तेव्हा ती दिपाचा अपमान करते. त्यामुळे दिपा आणि कार्तिकी यांच्यात वरचेवर खटके उडत असतात. त्यामुळे या मायलेकींचं फारसं एकमेकींशी पटत नाही. मात्र, ऑफस्क्रीन त्यांची चांगली गट्टी जमलेली आहे. अलिकडेच दिपाने कार्तिकीसोबत छानसे फोटो काढले आहेत.
या मालिकेत रेश्मा शिंदेने दिपाची भूमिका साकारली आहे. तर, अनुष्का पिंपुटकर ही कार्तिकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत मायलेकींची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा त्या सेटवर मज्जामस्ती करत असतात. या सेटवरचे फोटो, व्हिडीओदेखील त्या शेअर करत असतात. यामध्येच अनुष्काने तिचे रेश्मासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन या दोघींची असलेली घट्ट मैत्री दिसून येत आहे.