रंग माझा वेगळा: सौंदर्याने पळवलेल्या बाळाचं सत्य येणार समोर; दिपाला कळणार दिपिका आहे तिची लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:02 IST2022-06-26T15:01:01+5:302022-06-26T15:02:59+5:30
Rang maza wegla: सत्य समोर आल्यानंतर दिपा, पुन्हा कार्तिकशी लग्न करुन तिचं चौकटी कुटुंब पूर्ण करेल का?

रंग माझा वेगळा: सौंदर्याने पळवलेल्या बाळाचं सत्य येणार समोर; दिपाला कळणार दिपिका आहे तिची लेक
छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या या मालिकेत रंजक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. कार्तिक आणि दिपा यांनी एकत्र आणण्यासाठी कार्तिकी कसोशीने प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर तिच्यासमोर कार्तिकचं सत्यदेखील समोर आलं आहे. यामध्येच आता दिपासमोर दिपिकाचं सत्य येणार आहे. हॉस्पिटलमधून दिपिकाला सौंदर्याने पळवलं होतं हे तिला समजणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला डॉक्टरांकडून सत्य कळणार आहे. इतकंच नाही तर सौंदर्यानेच तिच्या एका मुलीला नेल्याचं स्पष्ट होणार आहे.
दिपा, डॉक्टरांकडे तिच्या दुसऱ्या मुलीविषयी माहिती घ्यायला जाते. यावेळी तुम्ही तुमच्या एका मुलीला घेऊन गेलात. त्यामुळे तुमच्या दुसऱ्या मुलीला सौंदर्या इनामदारने दत्तक घेतलं असं डॉक्टर सांगतात. यावरुन कार्तिकची मुलगी म्हणजे दिपिकादेखील आपलीच लेक असल्याचं दिपाला समजतं. त्यामुळे आता हे सत्य समोर आल्यानंतर दिपा, पुन्हा कार्तिकशी लग्न करुन तिचं चौकटी कुटुंब पूर्ण करेल का? या प्रकरणी ती सौंदर्या इनामदारला सत्य विचारायला जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.