Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:45 IST2023-03-03T19:44:18+5:302023-03-03T19:45:06+5:30
Aai kuthe kay karte: रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अन्य कलाकारांनी नवीन ट्रेंड फॉलो करत डान्स केला आहे.

Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या देशमुखांच्या घरी लग्नाची धावपळ सुरु आहे. अरुंधती आणि आशुतोष लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. म्हणूनच, चाहत्यांची ही उत्सुकता लक्षात घेता मालिकेतील कलाकार मंडळीदेखील सेटवरील प्रत्येक अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सेटवरील कलाकारांच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपाली कलाविश्वासोबतच सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून तिने मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून मालिकेतील बरेचसे कलाकार सेटवर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अन्य कलाकारांनी नवीन ट्रेंड फॉलो करत डान्स केला आहे. Tum Tum (From "Enemy") या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कलाकाराची एनर्जी पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या मालिकेत लवकरच आशुतोष आणि अरुंधती लग्नाची गाठ बांधणार आहेत. मात्र, या लग्नात अनिरुद्ध कशाप्रकारे विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.