कोण होणार करोडपतीच्या मंचावर होणार हास्यकल्लोळ; पहिल्यांदाच एकत्र येणार जॉनी आणि जेमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:15 IST2023-07-13T16:15:02+5:302023-07-13T16:15:30+5:30
Kon honaar crorepati: मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबईसाठी ही जोडी खेळणार आहेत.

कोण होणार करोडपतीच्या मंचावर होणार हास्यकल्लोळ; पहिल्यांदाच एकत्र येणार जॉनी आणि जेमी
जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय विनोदवीर जॉनी लिव्हर आणि त्याची लेक जेमी लिव्हर ही बापलेकीची जोडी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते या मंचावर एकत्र येणार आहेत. यावेळी हे दोघ मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळणार आहेत.
या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. त्यांच्यासोबत व्ही आय पी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केली.तर, जेमीने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवली. तिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केली. सचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढला.
विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत.