कोण होणार करोडपती: बाप-लेकीसोबत रंगणार प्रश्नांचा डाव; सचिन-श्रिया पिळगांवकर एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:30 IST2023-06-01T15:29:32+5:302023-06-01T15:30:35+5:30
Kon Honaar Crorepati: दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

कोण होणार करोडपती: बाप-लेकीसोबत रंगणार प्रश्नांचा डाव; सचिन-श्रिया पिळगांवकर एकाच मंचावर
जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम आणखी खास होतो. विशेष म्हणजे या शोच्या विशेष भागात मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर सहभागी होणार असून त्यांच्या सोबत त्यांची लेक श्रिया पिळगांवकरदेखील हॉट सीटवर बसणार आहे.
दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन आणि श्रिया यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या बाप-लेकीबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.
चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.