टीव्ही शो करणे म्हणजे आयुष्य व्यर्थ घालवण्यासारखे आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 02:12 PM2016-11-16T14:12:19+5:302016-11-16T14:15:34+5:30
अभिनेत्री बिपाशा बासूने तिचा पती करणसिंह ग्रोव्हर सह तिचा आवडती मालिका 'भाभीजी घर पर है' मध्ये हजेरी लावल्याचे पाहायला ...
अ िनेत्री बिपाशा बासूने तिचा पती करणसिंह ग्रोव्हर सह तिचा आवडती मालिका 'भाभीजी घर पर है' मध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.मात्र बिपाशा बासूला मुळात टीव्ही शो करणे आवडत नाही. 'डर सबको लगता है' या हॉरर शोमधून बिपाशाने छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. मात्र टीव्ही शोमध्ये काम करणे म्हणजे आपले अख्ये आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे.संपूर्ण दिवसांतून मालिकेसाठी 12-14 तास शूटींग करण्यातच पूर्ण वेळ जातो. 'डर सबको लगता है' या हॉरर शोसाठी मला 28 दिवस शूट करावे लागत होते.दिड वर्षापर्यंत ही मालिका सुरू राहणार होती. मात्र कधी ही मालिका संपते यातून माझी सुटका होतेय असचे वायचायचे ते दिड वर्ष देखील मला 10 वर्षाप्रमाणे वाटायचे.सिनेमासाठीही मी कधी इतकी धावपळ केली नसेल इतकी धावपळ या टीव्हीशोसाठी करावी लागली.त्या दरम्यान माझे आयुष्यच माझ्यापासून कोणी हिराऊन घेतेय असेच वाटायचे असेही बिपाशाने म्हटले आहे. लग्नानंतर बिपाशाला टीव्ही शोसाठी ब-याच ऑफर्स आल्या मात्र या शोचे लाँगटर्म शेड्यूअसल्समुळे ते स्विकारले नसल्याचेही तिने सांगितले. टीव्ही शो करणे म्हणजे आयुष्याच व्यर्थ घालवण्यासारखे आहे.यावर बिपाशाचे ठाम मत आहे.