'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले'च्या कथानकात येणार ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:29 AM2018-04-04T11:29:27+5:302018-04-04T16:59:27+5:30
सातत्याने वेगळे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच ७ एप्रिल रोजी ...
स तत्याने वेगळे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले' या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. या दोन्ही मालिकांच्या कथानकात लवकरच एक महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे.
'नकळत सारे घडले' मधले प्रताप, नेहा आणि परी फिरायला बाहेर जाणार आहे आणि तिथे त्यांची भेट 'शतदा प्रेम करावे' मधल्या उन्मेष आणि सायली यांच्यासोबत होणार आहे. उन्मेष आणि सायली यांच्यातल्या नात्याला प्रेमाची किनार मिळणार आहे. नेहा आणि उन्मेष यांची कॉलेजपासूनची ओळख असल्यामुळे रिसॉर्टवरील भेटीदरम्यान या दोन्ही जोडप्यांच्या बऱ्याच गप्पा टप्पा होणार आहेत. मात्र, त्या दरम्यान अशी एक घटना घडणार आहे की, त्यामुळे नेहाला धक्का बसणार आहे. ती घटना काय असेल, त्यातून पुढे काय घडेल, उन्मेष आणि सायली त्या परिस्थितीत काय करतील, त्यांच्या आयुष्याला काही वेगळं वळण मिळेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तर महासंगमच्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.
'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले' या दोन मालिका एकत्र आणून त्याची एक कथा गुंफण्याचा हा अभिनव प्रयोग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडली जात आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली असून या सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेचा प्रोमो सुरू झाल्यापासूनच या मालिकेतील छोटी परी प्रचंड चर्चेत आहे. ही परी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात.
Also Read : नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड