नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:57 PM2019-02-18T12:57:33+5:302019-02-18T13:03:53+5:30
‘दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडला आणि ‘द कपिल शर्मा’ शोमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
‘दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडला आणि ‘द कपिल शर्मा’ शोमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याच्या जागी या शोमध्ये अर्चना पूरण सिंगची वर्णी लागली. सोनी टीव्हीने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर तिच्या नावाची अधिकृत घोषणाही केली. पण सिद्धूला खरोखरचं या शोमधून बाहेर काढण्यात आले की केवळ काही एपिसोडसाठी अर्चनाला आणले गेले, हे सोनीने अद्यापही स्पष्ट केलेले नाही. नेमक्या याच कारणाने नेटकरी संतापले आहेत. याचा परिणाम म्हणजे, ट्विटरवर ‘अनसब्सक्राईब सोनी टीव्ही’ही मोहिम जोरात सुरु आहे.
‘सिद्धूबद्दलची अधिकृत माहिती न दिल्यास आम्ही सोनी चॅनल अनसब्सक्राईब करू आणि सोनी लिप अॅप सुद्धा फोनमधून डिलीट करू,’ अशी आक्रमक भूमिका नेटक-यांनी घेतली आहे. सिद्धू शोमध्ये राहिलाचं तर आम्ही तुमचे चॅनल बंद पाडू, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रियांचा ट्विटरवर पूर आला आहे.
जब तक ऑफिसियली बताओगे नही तब तक लोग तुम्हारे चेनल को अनसब्सक्राइब करना बंद नही करेंगे #UnsubscribeSonyTV
— बृज यादव (@yadavbrajkishor) February 17, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची भावना आहे. अशात या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, सिद्धू यांनी पाकिस्तानची पाठराखण करणारे वक्तव्य केले होते. काही लोकांच्या कृत्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार ठरवले जाऊ शकते का? हा हल्ला भ्याड होता. मी या हल्ल्याची निंदा करतो. पण ज्यांनी हा हल्ला केला त्यांना या कृत्याची शिक्षा मिळायला हवी, असे सिद्धू म्हणाला होता.
Not yet official confirmation....this may be only for this Sunday ...so don't subscribe it till official confirmation ...
— #VandeMaatram (@mwh_Pramod) February 17, 2019
If sidhu still remains on your show, we will be boycotting your channel by unsubscribing @SonyTV . We will make sure others will join us too. #UnsubscribeSonyTV
— Zunera Bibi Aslam (@BibiZunera) February 15, 2019