'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:28 PM2022-03-21T12:28:17+5:302022-03-21T12:28:46+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची चर्चा असताना आता या मालिकेतून दोन अभिनेत्रींनी ब्रेक घेतला आहे.

two actresses of Aai Kuthe Kay Karte took a break from the series? | 'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सतत चर्चेत येत असते. सध्या या मालिकेत अरुंधती व आशुतोष यांची मैत्री फुलताना दिसते आहे. आगामी भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, आशुतोष अरुंधती एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यानंतर आपल्या गाण्याचा अल्बम रिलीज करणार आहेत. अरुंधती व आशुतोष या एका अल्बम नंतर एकत्र काम करताना दिसणार आहे. एकत्रित काम करत असताना त्यांची मैत्री फुलणार आहे, मात्र आप्पा या दोघांच्या मैत्रीला तसेच येणाऱ्या नवीन नात्याला देखील नाव देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या मालिकेतील दोन अभिनेत्रींनी मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा रंगली आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्ध, अरूंधती, रुपाली, अनघा, कांचन, आप्पा, विमल, यश, गौरी, ईशा यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. तर आता या मालिकेतून मुख्य भूमिकेत असलेली अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर गोखले आणि संजना च्या भूमिकेत असलेले रुपाली भोसले या दोघीही मालिकेतून ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.


मालिकेतून मधुराणी प्रभुलकर आणि संजना भोसले या दोघीही ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात आहे. या मागचे कारण म्हणजे आगामी एका नाटकांमध्ये दोघेही एकत्र दिसणार आहेत. त्या एकत्र काम करत असलेल्या नाटकाबद्दल अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही. तसेच त्या दोघी मालिकेतून ब्रेक घेणार आहेत, या वृत्ताबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: two actresses of Aai Kuthe Kay Karte took a break from the series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.