ढाई किलो प्रेम या मालिकेसाठी मेहेरझान माझ्दा मारतोय जेवणावर ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2017 10:12 AM2017-04-18T10:12:48+5:302017-04-18T15:42:48+5:30

ढाई किलो प्रेम या मालिकेत मेहेरझान माझ्दा पियूष ही भूमिका साकारत आहे. पियूष हा अतिशय जाडा असल्याचे मालिकेत दाखवण्यात ...

For a two-and-a-half-yearly love affair, | ढाई किलो प्रेम या मालिकेसाठी मेहेरझान माझ्दा मारतोय जेवणावर ताव

ढाई किलो प्रेम या मालिकेसाठी मेहेरझान माझ्दा मारतोय जेवणावर ताव

googlenewsNext
ई किलो प्रेम या मालिकेत मेहेरझान माझ्दा पियूष ही भूमिका साकारत आहे. पियूष हा अतिशय जाडा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मेहेरझानने जवळजवळ 16 किलो वजन वाढवले आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे आणि त्यामुळे तो सध्या खूपच खूश आहे. जाड्या व्यक्तींना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, या मुद्द्यांची चर्चा करणाऱ्या या मालिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. टिव्हीवर कधीच कोणता नायक जाडा असलेला दाखवण्यात आलेला नाही. विनोदी कलाकार अथवा खलनायक जाडा असलेला आपल्या चित्रपट, मालिकांमध्ये पाहायला मिळते. पण या मालिकेने एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या मालिकेतील नायक हा जाडा असल्याने मेहेरझानने ही भूमिका साकारण्यासाठी त्याच्या खाण्या-पिण्याच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. तसेच तो सध्या मेदयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातो. त्याने या मालिकेसाठी त्याची जीवनशैलीदेखील बदलली आहे. सध्या मेहेरझान सेटवर 10 कोर्सचे शाही जेवण जेवतो, तसेच इतर कलाकारांप्रमाणे आपले आवडते जेवण खात असताना त्याला वजन वाढण्याची अजिबातच चिंता सतावत नाही. यासंदर्भात मेहेरझान सांगतो, "मला खायला खूप आवडते. पण मी एक अभिनेता असल्याने मला नेहमीच माझ्या जीभेवर नियंत्रण ठेवावे लागते. पण या मालिकेमुळे मला पाहिजे तितके आणि हवे ते खायला मिळत आहे. त्यामुळे हा माझा आवडता कालखंड आहे. मी खवय्या असल्याने दररोज चमचमीत खाणे मी एन्जॉय करत आहे. सेटवर माझ्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ मागवले जात आहेत. माझ्या जीभेचे चोचले मला मनसोक्त पुरवता येत असल्याने सध्या मी खूपच खूश आहे."

Web Title: For a two-and-a-half-yearly love affair,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.