संतोष जुवेकरच्या ‘इयर डाऊन’ मालिकेचा दोन तासांचा विशेष चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 02:11 PM2019-02-17T14:11:16+5:302019-02-17T14:13:46+5:30
सोनी मराठी वाहिनी जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हा या वाहिनीने वेगवेगळ्या पठडीतल्या मालिकांचा खजिना प्रेक्षकांसाठी आणला. कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या अनेक मालिकांपैकी एक आगळी-वेगळी मालिका म्हणजे ‘इयर डाऊन’.
सोनी मराठी वाहिनी जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हा या वाहिनीने वेगवेगळ्या पठडीतल्या मालिकांचा खजिना प्रेक्षकांसाठी आणला. कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या अनेक मालिकांपैकी एक आगळी-वेगळी मालिका म्हणजे ‘इयर डाऊन’.
समीर पाटील दिग्दर्शित या मालिकेत संतोष जुवेकर आणि प्रणाली घोगरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. संतोष जुवेकरने यामध्ये जन्मेजयची भूमिका साकारली होती जो एका संपन्न कुटुंबातला होता. पेशाने जन्मेजय हा उद्योजक जरी असला तरी, त्याच्याआयुष्यात आलेल्या मुलीच्या वडीलांच्या अटीनुसार त्याला अभियांत्रिकीची पदवी मिळवणे आवश्यक होते. आणि ती पदवी मिळवण्यासाठी जन्मेजयची सुरुवात महाविद्यालयातल्या प्रवेशापासून झाली होती आणि त्याचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे ‘इयर डाऊन’.
‘इयर डाऊन’चे पहिले पर्व संपले असून या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दुसरे पर्व फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार असून जन्मेजयने डिग्री पूर्ण केली की नाही आणि तो पुढे काय करणार आहे या गोष्टी यामध्ये पाहायला मिळणार आहेत. समीर पाटील हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. संतोष जुवेकरने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने केलेल्या रफ अँड टफ भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडल्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना संतोष नेहमी पेक्षा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. जन्मेजयच्या इंजिनियरिंगच्या प्रवासाचे पुन्हा एकदा साक्षीदार बनण्यासाठी प्रेक्षकांना दोन तासांचा विशेष चित्रपट ‘इयर डाऊन’ येत्या रविवारी, १७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.