महाराष्ट्रभर फिरुन देवीचे दागिने तयार केले अन्..; महेश कोठारेंच्या पत्नीने सांगितला विलक्षण अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:21 PM2024-10-02T15:21:57+5:302024-10-02T15:23:09+5:30

स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेत देवीचं रुप तयार कसं करण्यात आलं? याचा अनुभव महेश कोठारेंची पत्नी निलिमा यांनी सांगितला आहे

ude ga ambe marathi serial mahesh kothare wife neelima kothare share experience | महाराष्ट्रभर फिरुन देवीचे दागिने तयार केले अन्..; महेश कोठारेंच्या पत्नीने सांगितला विलक्षण अनुभव

महाराष्ट्रभर फिरुन देवीचे दागिने तयार केले अन्..; महेश कोठारेंच्या पत्नीने सांगितला विलक्षण अनुभव

नवरात्रौत्सवाच्या धामधूमीत स्टार प्रवाहवर ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ या मालिकेची चर्चा आहे. साडेतीन शक्तीपीठांची विलक्षण गोष्ट मालिकेत बघायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच मालिकेची चांगलीच उत्सुकता आहे.  महाराष्ट्राची श्रद्धास्थानं असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे. देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आणि त्यांच्या सहकारी नीता खांडके यांनी स्वतः मेहनत घेतलीय.

संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन तयार केले देवीचे दागिने

संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी देवीचे दागिने बनवून घेतले. देवीचं रुप साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  देवीचा मुकुट, कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कंबरपट्टा, तोडे, बाजुबंद, हार, कंठी, कुंडले या अलंकारांना फार महत्त्व आहे. हे सगळे अलंकार परिधान केलेल्या देवीचं रुप आपल्याला निशब्द करुन टाकतं. उदे गं अंबे ही महामालिका करण्याचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर नीलिमा आणि नीता यांनी दागिन्यांची शोधमोहिम सुरु केली. देवीसाठी लागणाऱ्या साड्या देखील खास बनवून घेण्यात आल्या आहेत.


आदिशक्ती रुप साकारणारी मयुरी कापडणे साकारतेय देवीचं रुप

आदिशक्तीचं रुप साकारणारी अभिनेत्री मयुरी कापडणेला जेव्हा आम्ही देवीच्या रुपात पाहिलं तेव्हा आम्हालाही साक्षात देवी समोर असल्याचा भास झाला. माहूरची देवी रेणुका, तुळजापूरची देवी भवानी माता कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि वणीची देवी सप्तशृंगी ही देवीची चार वेगळी रुपं मालिकेसाठी घडवण्याची संधी मिळणं हा देवीचाच आशीर्वाद आहे, अशी भावना नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी व्यक्त केली. याच साडे तीन शक्तीपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी पाहायला  ११ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे.

Web Title: ude ga ambe marathi serial mahesh kothare wife neelima kothare share experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.