'झांसी की रानी'मध्ये दिसली होती ही मुलगी, ग्लॅमरस अंदाज बघून बसेल सुखद धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:17 PM2018-08-17T15:17:53+5:302018-08-17T15:26:03+5:30

उल्का घराघरात राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखली जाऊ लागली होती. आता उल्का १९ वर्षांची झाली आहे.  

Ulka Gupta from jhansi ki rani glamour look | 'झांसी की रानी'मध्ये दिसली होती ही मुलगी, ग्लॅमरस अंदाज बघून बसेल सुखद धक्का!

'झांसी की रानी'मध्ये दिसली होती ही मुलगी, ग्लॅमरस अंदाज बघून बसेल सुखद धक्का!

googlenewsNext

(Image Credit : Ulka Gupta Instagram)

मुंबई : झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'झांसी की रानी' मध्ये मनुची भूमिका साकारणारी लहान राजपुत्री तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या मालिकेत राणी लक्ष्मीबाईची भूमिका ११ वर्षांच्या उल्का गुप्ताने साकारली होती. इतक्या लहान वयात ही इतकी आव्हानात्मक भूमिका साकारुन तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. उल्का घराघरात राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखली जाऊ लागली होती. आता उल्का १९ वर्षांची झाली आहे.  

'झांसी की रानी' या मालिकेच्या ७ वर्षांनी उल्काचे काही खास फोटो सोशल मीडियात समोर आले आहेत. या फोटोंमध्ये उल्काला पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण यात ती फारच वेगळी आणि बिनधास्त दिसत आहे. 

उल्काने नुकत्याच एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितके की, तिला सुरुवातीपासूनच अभिनयाची खूप आवड आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात ऑडिशनवेळी तिला चांगलाच स्ट्रगल करावा लागला होता. कारण तिचा रंग सावळा आहे. यामुळे ती अनेकदा ती रिजेक्ट झाली. 

हे फार कमी लोकांना माहीत असेल की 'झांसी की रानी' या मालिकेत दिसण्याआधीही अलकाने झी टीव्हीवरील एका मालिकेत दिसली होती. झांसी की रानीनंतर अलकाने  'देवों के देव महादेव', 'वीर शिवाजी' आणि 'सात फेरे' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. इतकेच नाही तर अलकाने टॉलिवूडमधील काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॉलिवूडनंतर आता उल्का लवकरच बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे करिअरसोबतच उल्का शिक्षणावरही लक्ष केंद्रीत करत आहे. 

Web Title: Ulka Gupta from jhansi ki rani glamour look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.