गुलमोहर मालिकेत प्रेक्षकांसाठी एक अनोखं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 04:55 AM2018-04-06T04:55:35+5:302018-04-06T10:25:35+5:30
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे झी ...
प रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे झी युवावरील गुलमोहर ही लोकप्रिय मालिका. या मालिकेने त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजनकेले आहे. 'पत्र' या आगामी गोष्टीतून महाराष्ट्राची आवडती कलाकार जोडी सीमा देव आणि रमेश देव प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही गोष्ट एका ५० वर्ष जुन्या पत्रावर आधारित आहे, पण हे प्रेम पत्र नसून ब्रेकअप साठी लिहिलेलं पत्रआहे. अशाच एका प्रेमाच्या ब्रेकअपची गोष्ट सांगणारी ही पत्र नावाची कथा आहे.
रमेश देव आणि सीमा देव व्यतिरिक्त या कथेत श्रेया (आरती मोरे) आणि सुबोध (रोहन गुजर) नावाची तरुण पिढीतील दोन पात्रं आहेत. श्रेया आणि सुबोध हे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करणारे आहेत मात्र काहीकारणावरून त्यांचे ब्रेकअप होतं आणि श्रेया त्याचं दुखात घरी जाताना तिला रस्त्यात एक पाकीट सापडतं ज्यात फक्त १०० रुपये आणि एक अगदी जुन्याकाळातील लिफाफा सापडतो त्यात एक चिठ्ठी देखील असते न राहून ती तो लिफाफाउघडून त्यातील चिठ्ठी वाचते, ती चिठ्ठी जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी शालिनीने थत्ये यांना त्याच्या प्रेमाचे ब्रेकअप पत्र लिहिले आहे शालिनी आणि थत्ये यांचे देखील एकमेकांवर मनापासून प्रेम होते मात्र घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रेम पुढेफुलू नाही शकले आणि म्हणून शालिनीने ते ब्रेकअप पत्र थत्येसाठी लिहिले होतो ज्यामध्ये शालिनीने आपले ब्रेकअप झाले असले तरी आपल्यातल्या भावना मात्र कायम चिरतरुण राहतील अशा आशयाचे मजकूर त्या पत्रामध्ये लिहिलाहोता आणि आज ५० वर्षानंतर देखील थत्ये आजोबांनी लग्न केले नसून ते आजही ते पत्र रोज वाचतात आणि शालिनीला आठवणींच्या रुपात स्वतःभोवतो असल्याचा आनंद घेतात हि गोष्ट जेव्हा श्रेयाला समजते तेव्हा तिला देखील आपणकुठे तरी सुबोध सोबत खूप घाई करून चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना अस वाटायला लागतं आणि हे ती सगळं सुबोध सोबत शेअर करते आणि दोघे मिळून ठरवतात कि आजोबा आणि शालिनी आजीला परत मिळवून द्यायचा.