आई कुठे काय करते'मधील 'अभि' उर्फ निरंजनबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:00 AM2021-04-29T07:00:00+5:302021-04-29T07:00:02+5:30
स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या सर्वांत लोकप्रिय मालिका आहे.
स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत अभिची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलकर्णीचा ही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला..
निरंजन मुळचा अंबरनाथचा असून त्याचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये झाला आहे. निरंजनला दोन बहिणी आहेत. त्याने नाशिकमधील institute of Aeronautic या कॉलेज मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलीये. तो कॉलेजमध्ये असताना एकांकिका आणि नाटक यामध्ये भाग घ्यायचा.. त्यातच त्याला २०१२ मध्ये झी मराठी वाहिनी वरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. याच मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
या मालिकेत त्याने दामोदर अभ्यंग हे पात्र साकारलं होत. यानंतर त्याने ‘तु माझा सांगाती , आपलं बुवा असं आहे , गणपती बाप्पा मोरया , जावई विकत घेणे आहे , तु अशी जवळी रहा या मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केल. आता निरंजनला प्रेक्षक आई कुठे काय करते या मालिकेतील अभिच्या भूमिकेमुळे भरभरुन प्रेम देत आहेत.