दुबईच्या रस्त्यांवर रिवीलिंग कपडे घालणे उर्फी पडले महागात, पोलीस चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:42 PM2022-12-20T17:42:24+5:302022-12-20T17:55:41+5:30

उर्फीच्या अंतरगी कपड्यांवरून तिच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मात्र यावेळी ती दुबईत फसली आहे.

Uorfi javed in trouble for shooting in revealing outfits in dubai says report | दुबईच्या रस्त्यांवर रिवीलिंग कपडे घालणे उर्फी पडले महागात, पोलीस चौकशी सुरु

दुबईच्या रस्त्यांवर रिवीलिंग कपडे घालणे उर्फी पडले महागात, पोलीस चौकशी सुरु

googlenewsNext

उर्फी जावेदची (Uorfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली.  कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. तिच्या बोल्ड ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा एकदा ती अडचणीत सापडताना दिसतेय. 

उर्फी जावेदला बर्‍याच सेलिब्रिटींनी बोल्ड आणि रिवीलिंग कपड्यांवरुन फटकारले आहे. इतकंच नाही तर काही लोकांनी उर्फीच्या अंतरगी कपड्यांवरून तिच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मात्र यावेळी उर्फीचे दुबईत फसली आहे.

उर्फी गेल्या काही दिवसांपासून दुबईत असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी ती दुबईला गेली आहे. तिथून उर्फी तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना सतत स्वतःबद्दल अपडेट देत आहे. मात्र दुबईच्या नियमांमुळे ती अडचणीत आली आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार उर्फी जावेदनं दुबईमध्ये तिच्या इंस्टाग्रामसाठी स्वत: तयार केलेल्या आउटफिटमध्ये एक व्हिडिओ शूट केला. दुबईतील लोकांना ते आउटफिट खूपच रिवीलिंग वाटलं. उर्फीच्या आउटफिटमुळे कोणतीही अडचण नाही, परंतु उर्फीने एका मोकळ्या जागेत तिचा व्हिडिओ शूट केला. दुबईतील नियमांनुसार त्या ठिकाणी असे कपडे परिधान करून शूट करण्याची परवानगी नाही. याबाबत पोलीस चौकशीसाठी आले आहेत. सध्या दुबई पोलीस उर्फीची चौकशी करत आहेत. 


 

Web Title: Uorfi javed in trouble for shooting in revealing outfits in dubai says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.