"मला खूप रडवलंय या लोकांनी"; इंडस्ट्रीत उर्फीला मिळालीये हीन दर्जाची वागणूक, भावूक झाली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:41 IST2024-06-05T13:41:28+5:302024-06-05T13:41:56+5:30
Uorfi javed: इंडस्ट्रीत मिळालेल्या हीन दर्जाच्या वागणुकीमुळे उर्फी प्रचंड कोलमडून गेली होती.

"मला खूप रडवलंय या लोकांनी"; इंडस्ट्रीत उर्फीला मिळालीये हीन दर्जाची वागणूक, भावूक झाली अभिनेत्री
अतरंगी फॅशन आणि चित्रविचित्र कपडे परिधान करुन कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Uorfi javed). सोशल मीडियावर उर्फीच्या ट्रेडिंग फॅशनची कायम चर्चा होत असते. उर्फी तिच्या अतरंगी पेहरावासोबतच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत येत असते. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीतील सत्य समोर आणलं.
अलिकडेच उर्फीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिच्या करिअरविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलत असतांना तिने इंडस्ट्रीमध्ये सहकलाकाराची किंवा छोटेखानी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचं सांगितलं.
"जर तुम्ही लीड रोलमध्ये नसाल तर सगळी संकटं तुमच्यावरच येऊन कोसळतात. सेटवर कोणीही तुमच्यासोबत चांगल वागत नाही. एका कार्यक्रमात मी साईड रोल केला होता. त्यावेळी मी बऱ्याच संकटांचा सामना केला आहे. अगदी कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते, वाईट कमेंट पास केल्या जातात. इंडस्ट्रीमधील काही प्रोडक्शन खरंच फार वाईट आहेत", असं उर्फी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "छोट्या पडद्यावर बऱ्याचदा काम केल्यावर तुम्हाला वेळात पैसे मिळत नाहीत. काही वेळा तर तुमचे पैसे कटही केले जातात. इंडस्ट्रीत खरंच खूप हरामी लोक आहेत. छोट्या पडद्यावर ज्यावेळी मी काम करायचे त्यावेळी माझी अवस्था खरचं खूप वाईट होती. मी साईड रोल करायचे ना मग माझी तेव्हा काहीच लायकी नव्हती. मला खूप रडवलंय त्या लोकांनी."
दरम्यान, उर्फीने LSD 2 च्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. परंतु, ती फार मोजक्या प्रोजेक्टमध्ये झळकली. सध्या उर्फी तिच्या अतरंगी फॅशनसेन्समुळेच चर्चेत येत असते.