उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:29 IST2025-02-14T14:29:18+5:302025-02-14T14:29:41+5:30

उर्फी जावेदच्या व्हायरल झालेल्या फोटोंमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Urfi Javed Engaged Photo With Comedian Harsh Gujral Viral Know Detail Information Engaged: Roka Ya Dhoka | उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय?

उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय?

Urfi Javed: उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या एका फोटोनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये उर्फी ही सुंदर सजलेल्या मंडपात उभी असून एक तरुण  गुडघ्यावर बसून तिच्या हातात अंगठी घालताना दिसून येतोय. उर्फीने (Urfi Javed engaged to mystery man in viral photo) गुपचूप साखरपुडा केला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. उर्फीला अंगठी घालणारा हा तरुण नेमका कोण आहे? तिनं खरचं साखरपूडा केला का? उर्फी कशाचं प्रमोशन करत आहे का?  असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर व्हायरल झालेल्या फोटोचं सत्य आपण जाणून घेऊया. 

आता खुद्द उर्फीने फोटोमागचं सत्य उघड केलं आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिनं लिहलं, 'ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लिजिये धोके का खतरा है, रोका करके जाना है'. सोबतच उर्फीनं #EngagedRokaYaDhoka असा हॅशटॅग दिलाय. तर उर्फी ही एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'एंगेज्ड रोका या धोका' असं या कार्यक्रमाचं नाव आहे.  हा कार्यक्रम आजपासून (१४ फेब्रुवारी)पासून डिज्नी + हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर येत आहे.

 


उर्फीसोबत दिसणारा तरुण हा प्रसिद्ध कॉमेडियन हर्ष गुजराल आहे.  तो उर्फीसोबत शो होस्ट करताना दिसणार आहे. या कार्यक्रमात २४० तास एकूण १० तरुण-तरुणी एकत्र राहणार आहेत. या घोषणेनंतर चाहते खूप उत्साहित आहेत. उर्फी याआधीही अनेक शोमध्ये दिसली आहे. उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, उर्फी मॉडल, एक्ट्रेस आणि सोशल मीडिया सेंशेसन देखील आहे. उर्फी तिच्या बोल्ड फॅशन आणि वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतेच. उर्फीने अनेक मालिकांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आणि ‘कसौटी जिंदगी के’ मध्ये देखील उर्फी दिसली. बोल्ड फॅशन आणि स्टेटमेंटसाठी उर्फी ओळखली जाते. 


Web Title: Urfi Javed Engaged Photo With Comedian Harsh Gujral Viral Know Detail Information Engaged: Roka Ya Dhoka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.