Urfi Javedला नावात बदल करणं पडलं महागात, या देशात मिळाली नाही एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:27 PM2022-11-25T12:27:20+5:302022-11-25T12:28:03+5:30

Urfi Javed : उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

Urfi Javed had to change his name expensively, did not get entry in this country | Urfi Javedला नावात बदल करणं पडलं महागात, या देशात मिळाली नाही एन्ट्री

Urfi Javedला नावात बदल करणं पडलं महागात, या देशात मिळाली नाही एन्ट्री

googlenewsNext

उर्फी जावेद(Urfi Javed)च्या अडचणीत सध्या वाढ होताना दिसत आहे, पण यावेळी उर्फीच्या अडचणीचे कारण तिचे कपडे किंवा तिचा लूक नसून तिचे नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तिच्या नावामुळे कोणी अडचणीत कसे येऊ शकते. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण.

अरब देशाच्या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या आहेत. अरब देशाच्या नव्या नियमानुसार आता अरब देशांनी पासपोर्टवर एकच नाव असलेल्या भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आणि माहिती दिली की ती कधीही यूएईला जाऊ शकणार नाही.
उर्फी जावेदने स्टोरीमध्ये लिहिले की, 'माझे अधिकृत नाव आता फक्त UORFI आहे.' नवीन नियमांमुळे उर्फी जावेद कधीही अरबमध्ये जाऊ शकत नाही. खरे तर उर्फीने काही दिवसांपूर्वी तिने नाव बदलले होते. या बदलासोबतच उर्फीने आपल्या नावाच्या इंग्रजी अक्षरांमध्ये 'O' जोडले होते. हा बदलही तिने आपल्या सर्व कागदपत्रांमध्ये केला होता. उर्फी जावेदच्या पासपोर्टवर आता तिचे नवीन नाव आहे. या बदलासोबतच तिने जावेद पासपोर्टमधून काढून टाकले आहे. आता हा बदल उर्फीला खूप महागात पडला आहे.


२१ नोव्हेंबर रोजी, एअर इंडिया आणि एआय एक्सप्रेसने घोषणा केली की UAE इमिग्रेशन विभाग भारतीयांना त्यांच्या पासपोर्टवर एकच नाव ठेवण्याची परवानगी देणार नाही. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट लूकमुळे खूप चर्चेत आली होती. कधी उर्फी मोबाईल फोनचा टॉपमध्ये दिसते तर कधी ती बँडेजचा ड्रेस घातलेला दिसते.

Web Title: Urfi Javed had to change his name expensively, did not get entry in this country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.