कोण आहे उर्फी जावेदच्या या अतरंगी ड्रेसचा डिझायनर? फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:41 AM2021-12-26T11:41:31+5:302021-12-26T11:44:42+5:30
Urfi Javed : उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, तिचे हे ड्रेस कोण डिझाईन करतं, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वाचा...
‘बिग बॉस ओटीटी’आधी उर्फी जावेद (Urfi Javed ) हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे.अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते. कधी कधी तर इतके अतरंगी कपडे घालते की, ट्रोलही होते. तिचा ताजा लूकही असाच. होय, ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा विचित्र ड्रेस पाहून लोकांनी कपाळावर हात मारला नसेल तर नवल. हा असा अतरंगी ड्रेस कोणी डिझाईन केला असावा? (Urfi Javed Dress Designer) असा प्रश्नही अनेक चाहत्यांना पडला. अनेक युजर्सनी हाच एक प्रश्न केल्यावर उर्फीने अखेर या ड्रेसच्या डिझायनरचा खुलासा केलाच. होय, तिने चक्क या ड्रेसच्या डिझायनरचा फोटो शेअर केला. तो पाहून लोक हैराण झालेत.
‘हा ड्रेस कोणी डिझाईन केला, असा प्रश्न अनेकांनी मला मॅसेज करून विचारला. उत्तरासाठी उजव्या बाजूने स्वाईप करा आणि त्याचा फोटो एकदाचा बघून टाका. प्लीज, त्याला दोष द्या, मला नाही,’ असं लिहित उर्फीने ब्ल्यू आऊटफिटमधील फोटो शेअर केला.
लोकांनी मोठ्या उत्सुकतेने राईट स्वाईप करून पहिलं तर शेवटच्या स्लाईडवर एका उंदराचा फोटो दिसला. होय, तुम्हालाही हा फोटो पाहून हसू आवरणार नाही. हा उंदीर एका ब्ल्यू कलरच्या कपड्यावर बसून कापड कुरतडताना दिसतोय.
उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते.