Video : हिला वेड लागलं का? उर्फी जावेदची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:05 PM2022-01-17T12:05:44+5:302022-01-17T12:06:32+5:30
Bigg Boss OTT fame Urfi Javed Spotted at Airport : होय, काल एअरपोर्टवर उर्फी अशा काही अवतारात दिसली की, पुन्हा ट्रोल झाली.
बिग बॉस ओटीटीमुळे (Bigg Boss OTT ) प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. आत्ताही तिच्या कपड्यांचीच चर्चा आहे. होय, काल एअरपोर्टवर उर्फी अशा काही अवतारात दिसली की, पुन्हा ट्रोल झाली. काळ्या रंगाचा लेसी बॉडीसूट आणि डेनिम जीन्स अशा अवतारात ती एअरपोर्टवर स्पॉट झाली. साहजिकच तिचा तो लूक पाहून सगळेच थक्क झालेत.
पापाराझींना पोझ दिल्यानंतर उर्फी तिच्या टीमसोबत गप्पा मारताना दिसली. मी खूप थकलेय. सलग तीन दिवस न झोपता शूट केलंय. माझ्या चेहऱ्यावरही थकवा दिसत असेल. मला थंडीत शूट करणं आवडत नाही. छोटे कपडे घालण्यात मात्र मज्जा येते, असं ती म्हणताना दिसली.
झाली ट्रोल
उर्फीचा हा अवतार पाहून युजर्सनी तिला पुन्हा ट्रोल केलं. हिला वेड लागलं का? प्रसिद्धीसाठी ही बया काय काय करते, देवा हिला वाचव, अशा कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते आणि यामुळे दर दिवसाआड सोशल मीडियावर ट्रेंड करते. अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उर्फीला यामुळे जराही फरक पडत नाही. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते.