"मला गरम होतंय..." म्हणत एअरपोर्टवरच कपडे काढले उर्फी जावेदनं, व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:08 IST2024-04-02T16:07:35+5:302024-04-02T16:08:12+5:30
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड अभिनेत्री बनणार आहे. तिचा पहिला चित्रपट LSD 2 काही दिवसात प्रदर्शित होणार आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

"मला गरम होतंय..." म्हणत एअरपोर्टवरच कपडे काढले उर्फी जावेदनं, व्हायरल होतोय व्हिडीओ
सोशल मीडियावर सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेद(Urfi Javed)ला प्रसिद्धीझोतात कसे राहायचे हे चांगलेच ठाऊक आहे. कोणता ड्रेस कधी घालायचा हे तिला चांगलं माहीत आहे. उर्फी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलीकडेच तिचा आगामी 'एलएसडी २' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा ॲडल्ट कंटेंटवर आधारित चित्रपट आहे, जो कुटुंबासोबत न पाहण्याच्या सूचना निर्मात्यांनी आधीच दिली आहे.
उर्फी 'एलएसडी 2' या सिनेमातून डेब्यू करत आहे. अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पण कथेत एक ट्विस्ट आहे. यावेळी लोक तिच्या पेहरावाबद्दल बोलत नाहीत, तर तिच्या ड्रेसबाबतच्या कृतीबद्दल बोलत आहेत. मुंबई विमानतळावरील उर्फी जावेदचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने लाल टी-शर्ट आणि त्यावर पिंक रंगाची फर घातली आहे. पण या ड्रेसमध्ये तिला खूप उकडत होते. अशा परिस्थितीत कोणाच्याही लक्षात न येता उर्फी विमानतळावर कपडे बदलू लागली.
'आंघोळही करता येते'
उर्फी जावेदने फर ड्रेसचे फायदेही सांगितले. ती म्हणाली की, ते इतके मोठे आहे की त्यात आंघोळही करता येते. मात्र, उर्फीने विनोदाच्या स्वरात ही टिप्पणी केली.
चाहत्यांनी ट्रोल केले
पुन्हा एकदा उर्फी युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकाने विचारले की, 'ती एअरपोर्टवर राहते का?' एकाने लिहिले की, 'शाहरुख सलमानही तितके विमानतळावर येत नाही.'