Urfi Javedची दुबईत बिघडली तब्येत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:20 PM2022-12-19T19:20:43+5:302022-12-19T19:21:11+5:30
Urfi Javed : उर्फी सध्या दुबईत असून तिथे तिची तब्येत इतकी बिघडली की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
आपल्या विचित्र स्टाईलने सतत उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिला विचित्र फॅशन सेन्समुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र आता उर्फी जावेदची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. उर्फी सध्या दुबईत असून तिथे तिची तब्येत इतकी बिघडली की रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
उर्फी जावेद सध्या दुबईत आहे. आता ती दुबईत शूटिंगसाठी गेली आहे. तिथे गेल्यानंतर उर्फीची तब्येत बिघडली आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉस्पिटलच्या बेडवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगते आहे की, तिला लॅरिन्जायटीस (व्हॉईस बॉक्सचा संसर्ग) झाला आहे. ती तिच्या आजाराबद्दल मित्राशी बोलत आहे, पण डॉक्टर तिला बोलू देण्यास नकार देतात.
आजारपणात उर्फीचा लूक बराच बदललेला दिसत आहे. उर्फीच्या डोळ्याखाली डार्क सर्कल दिसत आहे. मेकअपशिवाय आणि आजारपणामुळे उर्फी एकदम बदललेली दिसते. उर्फीचा कोमेजलेला चेहरा पाहून चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. उर्फीच्या आजारपणाची बातमी समोर येताच, तिचे चाहते चिंतेत आहेत. उर्फी लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. उर्फीची तब्येत बिघडल्याने चाहतेही दु:खी झाले आहेत.
उर्फी आजारी असली, तरीपण आजारपणातही ती चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आदल्या दिवशी उर्फीने केशरी ड्रेसमध्ये व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना चकीत केले होते. नेहमीप्रमाणे उर्फीच्या या लूकचीही खिल्ली उडवली गेली. काहींनी उर्फीचा लूक समोसा असल्याचे सांगितले तर काहींनी म्हटले की ती मुलांना गणित शिकवण्याची तयारी करत आहे.