"अपघातातून हळूहळू सावरतेय...", उर्मिला कोठारेने शेअर केला Video, व्यायाम करणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:16 IST2025-01-24T13:15:57+5:302025-01-24T13:16:29+5:30

उर्मिला कोठारे हळूहळू अपघातातून सावरत आहे. ती व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

urmila kothare going slow fitness journey after her major accident shares video | "अपघातातून हळूहळू सावरतेय...", उर्मिला कोठारेने शेअर केला Video, व्यायाम करणंही झालं कठीण

"अपघातातून हळूहळू सावरतेय...", उर्मिला कोठारेने शेअर केला Video, व्यायाम करणंही झालं कठीण

मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला कोठारेचा (Urmila Kothare) काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. शूटिंगवरुन परतत असताना मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर या मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाले. इतकंच नाही तर तिच्या गाडीची मेट्रो स्टेशनवर काम करणाऱ्या मजुरांना धडक बसली. यात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान उर्मिला या अपघातातून हळूहळू सावरत आहे. तिने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

अपघातातून हळूहळू बरी होत असताना उर्मिला थोड्याफार प्रमाणात व्यायाम करायला लागली आहे. सध्या तिच्यासाठी हे फारच अवघड जात असून तिने व्हिडिओमधून आपल्या भावना मांडल्या आहेत. ती म्हणते, "रुग्णालयातून घरी आल्यानंतर बेडवर पडून राहणं खूप कंटाळवाणं होऊ शकतं. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पडून राहिलेली नाही. मला तर शक्यच नाही. मी शारिरीकरित्या किती सक्रीय असते हे तुम्हाला माहितच आहे. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की अपघात, सर्जरी, गंभीर आजार अशा घटना जेव्हा आयुष्यात घडतात तेव्हा माझाही मोठा अपघात झाला त्यानंतर मी माझ्या फिटनेसचा प्रवास कसा पुन्हा सुरु करतेय आणि त्याच्यात खूप काळाचा व्यत्यय येऊ देत नाहीये हे मी तुम्हाला दाखवते."


उर्मिला जमेल तसा व्यायाम करत पुन्हा फिट होण्याचा प्रयत्न करत आहे.  यात तिला होणारा त्रास व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मात्र तरी तिने हार मानलेली नाही. नियमित ती योग करत शरीर सुदृढ करण्याकडे तिची वाटचाल सुरु आहे.उर्मिलाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्यासाठी लवकर बरी हो अशी प्रार्थनाही केली आहे. 

कधी झाला अपघात?
२७ डिसेंबर रात्री १ वाजताच्या सुमारास उर्मिला शूटिंगवरुन घरी येत असताना  हा अपघात झाला. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाले. गाडीतील एअर बॅग्समुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू झाले होते.

Web Title: urmila kothare going slow fitness journey after her major accident shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.