मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:05 PM2020-05-02T13:05:51+5:302020-05-02T13:06:23+5:30
मोबाईलच्या अतिवापरामुळे ही अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच आहेत. त्यामुळे सध्या सगळेच मोबाइलचा अतिवापर करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम नकळतपणे आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. मोबाइलचा असाच अतिवापर करणे एका अभिनेत्रीला महागात पडले आहे. ती सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे.
टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया टेनिस एल्बो या आजाराचा सामना करत आहे. उर्वशी सध्या Trending Now नावाच्या एका व्हर्चुअल चॅटमध्ये उर्वशी रौतेलाने सांगितले की, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व काम स्वतःची स्वतःला करावी लागत आहेत. फोनवर सतत काम केल्यामुळे सध्या मला टेनिस एल्बो या आजाराचा सामना करावा लागतो आहे.
स्पॉटबॉयच्या रिपोर्ट्सनुसार उर्वशी म्हणाली की, काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बोचा त्रास होऊ लागला होता. हा आजार सतत फोन पकडल्यामुळे झाला होता. कारण मला माझ्या शोचे सर्व काम फोनवर करावे लागते. माझा शो मी स्वतः एडिट करते. या शोचे सर्वाधिक एपिसोड हे मी स्वतः एडिट केलेले आहेत.
सध्या लॉकडाउनमध्ये घरी आहात म्हणून सतत फोनचा वापर करणे महागात पडू शकते. त्यामुळे त्याचा वापर कितपत करावा हे आता तुम्हालाच ठरवावे लागेल.