'काय तो कोळी समाज..'; आलिबागला गेलेल्या उत्कर्ष शिंदेला आला भन्नाट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 07:08 PM2022-07-27T19:08:52+5:302022-07-27T19:09:15+5:30

Utkarsh Shinde: उत्कर्षने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत अलिबागमध्ये आलेला भन्नाट अनुभव शेअर केला आहे.

Utkarsh Shinde share Alibaug wonderful experience | 'काय तो कोळी समाज..'; आलिबागला गेलेल्या उत्कर्ष शिंदेला आला भन्नाट अनुभव

'काय तो कोळी समाज..'; आलिबागला गेलेल्या उत्कर्ष शिंदेला आला भन्नाट अनुभव

googlenewsNext

'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेला गायक, डॉक्टर म्हणजे उत्कर्ष शिंदे. या शोमध्ये टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे उत्कर्ष विशेष चर्चेत राहिला. कलाविश्वासह उत्कर्ष सोशल मीडियावरही सक्रीय असून त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यात त्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत अलिबागमध्ये आलेला भन्नाट अनुभव शेअर केला आहे.
उत्कर्ष अनेकदा त्याच्या वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या वा त्याला येत असलेल्या अनुभवाविषयी सोशल मीडियावर भाष्य करत असतो. यात अलिकडेच तो अलिबागला गेला होता. येथे गेल्यानंतर एका मासे विकणाऱ्या आजीसोबत त्याने कशी मज्जा केली हे सांगितलं.

“आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय " आजच्या रिऍलिटी शो च्या युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्ही वर ही दिसतात पण काही असे ही कलाकार आहेत ज्यांना परिस्थितीमुळे स्वतःला सादरच नाही करता आल,त्यांच काय ? अलिबागवर आधारित एक गाणं करण्यासाठी मी अलिबागमध्ये शूटसाठी गेलो असता एका सीनसाठी अलिबागच्या मच्छी मार्केटला जाण झालं. आणि, तिकडेच मला भेटली एक मस्तमौला बाहुली सारखी नाचणारी, गाणारी मासे विकणारी आजी. मला पाहताच जिने तू प्रल्हाद शिंदे -आनंद शिंदेच्या घरचो काय? असं विचारलं आणि अस विचारातच उत्साहाने गाणं सुरु केलं .आणि मग काय मी पण माझी शूटिंग थांबवून त्या आजी कडचा लोककलेचा खजिना ऐकत, पाहत राहिलो त्या आजीने भरभरून तिचे कोळीगीत तर ऐकवलेच पण महान गायक विठ्ठल उमप व प्रल्हाद शिंदे ह्यांच्या त्या काळातील अलिबाग मधला त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या कैक आठवणी सांगितल्या. मला तर जसा खजिनाच सापडला", असं आदर्श म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "हातावर पोट असणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्यासारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड, किती ऊर्जेने भरलेला आहे ही प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली. आणि मनात विचार आला "आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय. आजीला भेटून त्यांचे कोळीगीत ऐकून माझी तर ऊर्जा द्विगुणित झाली ,मी शूटिंग संपवली आणि मग सुका म्हावरा ,कोळंबी ,सुखट, पापलेट ,सोलकडी वर ताव मारत काय ते मासे ..काय तो समुद्र ..काय तो कोळी समाज ..सगळं ok मधी हाय ..म्हणत अलिबागचा निरोप घेतला."
 

Web Title: Utkarsh Shinde share Alibaug wonderful experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.